अंतराळातील मानवी विष्ठेचा पुनर्वापर कसा करायचा? भन्नाट आयडीया देणार्याला नासाकडून 25 कोटींचं बक्षीस!
- Navnath Yewale
- Apr 12
- 2 min read

नॅशनल अॅरोनॉटीक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा अंतराळात विविध प्रयोग करत असते. त्यामुळे मानवाला अंतराळ विश्वातील विविध गोष्टींचा उलगडा होतो. अंतराळ विश्वातील गोष्टींबद्दल जनजागृती व्हावी यासाठी नासा विविध स्पर्धा आयोजित करत असते. नासाने असेच एक अनोखे चॅलेंज दिले आहे. तुम्ही हे चॅलेंज स्वीकारलात तर तुम्हाला 25 कोटी रुपयापर्यंत रक्कम जिंकण्याची संधी आहे. काय आहे चॅलेंज? सविस्तर जाणून घेऊया.
अंतराळात मानवी कचर्याचा पुनर्वापर कसा करायचा? याचे मार्ग शोधण्याचे अवाहन नासाने केले आहे. योग्य मार्ग शोधणार्या व्यक्तीला 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 25 कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल. याला लूना-रीसायकल चॅलेंज असे म्हटले जातंय. चंद्रावर किंवा लांब अंतराळ प्रवासादरम्यान मानवी विष्ठा, मूत्र आणि उलट्यांचा पुनर्वापर करू शकेल. असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे अवाहन नासाकडून करण्यात आले आहे.
चॅलेंजचे महत्व काय?
नासाने दिलेल्या माहितीनुसार, अपोलो मोहिमेदरम्यान चंद्रावर मानवी मलमूत्राच्या 96 पिशव्या सोडण्यात आल्या होत्या. आता अवकाशातील कचर्याचा ढीग वाढू नये असे नासाला वाटतंय. भविष्यातील मोहिमांमध्ये कचरा पुनर्पाप्त करण्यास मदत करू शकेल असे तंत्रज्ञान विकसित करणे हा नासाच्या चॅलेंज मागचा उद्देश आहे. चंद्रावरील दिर्घकालीन वसाहतींमध्ये हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल अशी नासाला अपेक्षा आहे. नासाने त्यांच्या वेबसाईटवर या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ‘ आपण दिर्घकाळ अंतराळात राहण्याची तयारी करत आहोत.
यासाठी कचरा कमी करणे आणि त्याचा पुनर्वापर करणे खूप महत्वाचे आहे. कोणताही कचरा पृथ्वीवर परत आणला जाऊ नये याची आम्हाला खात्री करायची असल्याचे नासाने म्हटलं आहे. नासाने लोकांना अंतराळातील मानवी विष्ठेचा पुनर्वापर या समस्येवर उपाय शोधण्यास सांगितले आहे. सध्या नासा पहिल्या फेरीत पाठवलेल्या आयडीयाची तपासणी करतंय. यातील सर्वोत्तम कल्पना निवडून पुढील फेरीसाठी पाटवल्या जातील. हे चॅलेंज जिंकणार्या टीमला 3 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस मिळेल. हे चॅलेंज अवकाशात तर मतद करेलच सोबत पृथ्वीवर पुनर्वापराचे नवीन मार्ग देखील यामध्यमातून मिळेल, असे नासाने म्हटलं आहे.
पृथ्वीसाठी फायदेशीर
पृथ्वीवरील कचर्याच्या चांगल्या व्यवस्थापनासाठीया चॅलेंजच्या माध्यमातून नवीन कल्पना मिळू शकते. यामुळे लहान लहान टीममधून नवीन पुनर्वापर तंत्रे पुढे येऊ शकतात. जी कमी विषारी कचरा सोडतील आणि अधिक कार्यक्षम असतील. हे आव्हान जगभारातील शास्त्रज्ञ, अभियंते आणि सामान्य लोकांसाठभ एक उत्तम संधी आहे. या अनोख्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी लोक उत्साहाने सहभागी होतील असा नासाला विश्वास आहे.
Comments