अखेर चीनने रंग दाखवलेच
- Navnath Yewale
- Apr 26
- 2 min read
भारता विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला क्षेपणास्त्र

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारत भारत कसा बदला घेईल याच्या धास्तीत असलेल्या पाकिस्तानने आता चीनकडे भिक मागतली आहे. अशा परिस्थितीत चीनने तटस्थ रहाणे अवश्यक असताना चीनने पाकिस्तानसाठी एक पाऊल उचचलं आहे. भारतासाठी ही चिंताजनक बाब आहे. कारण चीनने अशावेळी तटस्थ राहण गरजेच असताना त्यांनी पाकिस्तानला भारतावर चालवण्यासाठी एक घातक शस्त्र दिलं आहे. पहगाम दहशतवादी हल्यामुळे तणाव टोकाला पोहोचला आहे.
सध्या भारत -पाकिस्तानमध्ये मोठा तणाव आहे, पहलगाम दशहतवादी हल्ल्यानंतर खवळलेला भारत कसा बदला घेणार ? हीच भिती पाकिस्तानला आहे. आंततराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानच्या मदतीला अखेर चीन धावून आला आहे. चीनने सवयीप्रमाणे आपले खरे रंग दाखवले आहेत. चीनने पाकिस्तानला 100 पेक्षा जास्त पीएल-15 लॉन्ग रेंज एअर टू अएअर हल्ला करु शकणारी (व्हिएल राम) मिसाइल्स दिली आहेत. हा तणाव कुठल्याही क्षणी मोठ्या युद्धात बदलू शकतो, हा त्या मागचा संदेश आहे.
या मिसाइल्सची रेंज 200 किलोमिटर असल्याचं सांगितलं जात आहे. पीएल-12 पेक्षा ही रेंज अधिक आहे. जेएफ -17 मधून पीएल -12 ची 100 किलोमिटर रेंज आहे. पाकिस्तानी एअरफोर्सने पीएल-15 एअर-टू- एअर मिसाइल (व्हिएल राम) जेएफ-17 थंडर ब्लॉक-3 मध्ये फिट केलं ओ. विंग टिप्सरवर पीएल -10 इ डब्ल्यूव्हिआरएम हॉब्स सक्षम मिसाइल दिसत आहे. भातर - पाकिस्तान तणावादरम्यान पाकचे परराष्ट्र मंत्री आणि चीनी डिप्लोमॅट्सची बैठक झाली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनचे आभार सुद्धा मानले आहेत.
ताणावाच्या परिस्थितीत पाकिस्तानला मदत
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन माहिती दिली की, चिनी राजूत जियांग जैदोंग यांनी उपपंतप्रधान/ परराष्ट्र मंत्री सीनेटर मोहम्मद इशाक डार यांच्याशी चर्चा केली. दोघांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. अलीकडच्या काही वर्षात पाकिस्तान आणि चीनमध्ये रणनितीक भागिदारी अधिक दृढ झाली आहे. तणावाने टोक गाठले असताना चीनने पाकिस्तानला ही मतद केली आहे.
पाकिस्तानसाठी या वीटो पावर अधिकाराचा वापर
भारताविरुद्ध लढाई एकट्या पाकिस्तानला पेलवणारी नाही. त्यामुळे ते नेहमीच चीनकडे हात पसरतात. आता सुद्धा त्यांनी तेच केल आहे. चीनने शस्त्रास्त्र देण्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच पाकिस्तानची पाठराखण केली आहे. चीनकडे संयुक्त राष्ट्रात वीटो पावर आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानसाठी या वीटो पावरचा अधिकार सुद्धा वापरला आहे.
पहलगाम हल्ल्याचा किळसवाणा प्रकार समोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे . जवळपास 20 मृतांच्या पॅन्ट्स कमरेच्या खाली खेचलेल्या होत्या. त्या पॅन्ट्सची चैन खुली होती. सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन हे 26 निष्पाप देह पाहणार्या टीमच्या अधिकार्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आली.पर्यटकांची हत्या करण्यापूर्वी दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म तपासल्याचं यातून दिसून येत आहे.
Comments