... अखेर ठाकरे बंधु एकत्र; सत्ताधार्यांवर ठाकरे शैलींच्या तोफांचा भडिमार!
- Navnath Yewale
- 4 days ago
- 4 min read
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका, एकनाथ शिंदेचाही समाचार; दोन्ही ठाकरेंकडून ‘सन्माननिय’ आदराने भाषणाला सुरुवात

मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधु एकत्र येणार का? या प्रश्नावर अखेर आज पडदा पडला. निमित्त होते मराठी भाषीकांच्या विजयी सभेचे. वरळी येथे दोन्ही ठाकरे बंधुच्या वतिने मराठी भाषीक विजयी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा अथवा चिन्ह वापरण्यात येणार नाही, अशा सूचना पूर्वीच देण्यात आल्या होत्या. शिवसेना (उबाठा), मनसे च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेत्यांचीही यावेळी उपस्थिती होती. सरकारच्या त्रिभाषा धोरणांसह हिंदी भाषा सक्तीवरुन राज ठाकरे यांनी सत्ताधार्यांचे वाभाडे काढले तर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर सडकूण टीका केली.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात ‘सन्माननिय’ उद्धव ठाकरे अशी करताच उपस्थितांतून टाळ्यां प्रतिसादाने घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारच्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर सडकून टीका केली. दरम्यान, केवळ मोर्चाच्या चर्चेनेच निर्णय मागे घ्यावा लागल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आज मोर्चा असायला हवा होता, मराठी माणूस कसा सर्व बाजून एकवटतो याचं चित्र मोठ्या प्रमाणात उभं राहिलं असतं. मी एका मुलाखती म्हटलं होतं कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, तिथून हे सगळं सुरु झालं. वीस वर्षानंतर आम्ही दोघे व्यासपीठावर एकत्र आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही अनेकांना जमलं नाही आम्हा दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असा उपरोधक टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, मोर्चात जी घोषणा होती तीच घोषणा आजच्या मेळाव्यात असल्याचे म्हणत कुठलाही झेंडा नाही मराठी हाच अजेंडा असल्याचे म्हणत. महाराष्ट्र आणि मराठीकडे वाकड्या नजरेनी पहायचं नाही कोणी असा सज्जड दमही त्यांनी भरला. कुठून अचानक हिंदीचं आल ते कळलंच नाही, आणि हिंदी कशासाठी कोणासाठी हिंदी लहान मुलांवर जबरदस्ती करताय. आमच्या हतात सत्ता आहे आम्ही लादणार. तुमच्या हातात सत्ता असेल ती विधानभवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर.
वांरवार मागणी केली नंतर दादा भुसे आले आणि म्हणाले ‘आम्ही काय म्हणतोय ते समजून तर घ्या, ऐकून तर घ्या.’ मी त्यांना स्पष्ट सांगितलं ‘ऐकून घेईल, पण ऐकणार नाही’. मराठी भाषाच्या सुत्रामध्ये तुम्ही दुसरी भाषा लादताय. काय तर त्रिभाषा सुत्र कुठलं त्रिभाषा सुत्र आणलं. त्रिभाषा सुत्र आणलं त्यावेळेला केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधल्या दुव्यासाठी म्हणून हे त्रिभाषा सुत्र आणलं गेलं. पण महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो आणि काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली. हिंदी भाषीक राज्य आर्थीकदृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्य आर्थीक दृष्ट्या प्रगत. यांना हिंदीतून राज्य सांभळता नाही आलं. नोकरीसाठी तिकडून लोकं इकडं येतात. कोणासाठी हिंदी शिकायचं? हिंदी भाषेला विरोध नाही, कोणतीही भाषा उत्तमच असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. काल-परवा अमित शाह म्हणाले ज्याला इंग्रजी यते, त्याला लाज वाटेल इंग्रजी येेते त्याची.
या संपूर्ण हिंद प्रांतामध्ये 125 वर्षे मराठ्यांनी राज्य केलं त्यावेळी मराठी लादली? यांनी फक्त चाचपडून पाहिलं मुंबई स्वतंत्र करता येते का? यासाठी आगोदर भाषेला डिवचून बघु, महाराष्ट्र शांत राहिला, तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्याली त्याने महाराष्ट्र, मुंबईला हात घालून दाखवावं असा सज्जड दमही त्यांनी भरला. काय मजाक लावलीय का? आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत असा इशारा देत राज ठाकरे भाषेतील माध्यमतून शिक्षणवर बोट ठेवत मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या हिंदी बोलण्यावर फेफरं येईल अशी मिस्कीलीने टीका करत स्व. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमातून शिकले पण मराठी अभिमानाशी कधी तडजोड केली नाही.दरम्यान, राज ठाकरे यांनी राजकारण्यांसह अभिनेत्यांची मुलं विदेशात शिक्षण घेत असल्याची यादीच समोर मांडत ज्येष्ट राजकारणी कोणत्या माध्यमांच्या शाळेत शिकले याची यादीच वाचून दाखवली.
भाजपचे ज्येष्ट नेते लालाकृष्ण आडवानी ख्रिश्चन शाळेत शिकले त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेता येईल का? सत्ताधार्यांचं यामागचं राजकारण काय आहे हे पुढचं राजकारण जातीमध्ये विभागायला सुरवात करतील जातीच कार्ड खेळाला सुरवात करतील. मराठी म्हणून आपल्याला एकत्र येऊ देणार नाहीत. मिरा भाईंदर येथील व्यापारी मारहाणीचे उदाहरण देत व्यापार्याच्या कपाळावर गुजराती लिहिलेलं होत का? आजुनतर काहीच केलेलं नाही असा इशाराही त्यांनी दिला. यावेळ विनाकारण मारामारी करण्याची गरज नाही, खूप नाटकं केले तर कानफटात मारायलाच हवी. अशी कुठची गोष्ट करताना व्हिडिओ काढू नका आपल्यातच त्याला कळलं पाहिजे अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
दरम्यान, स्व. बाळासाहेब यांच्या सोबतचा किस्सा सांगत राज ठाकरे म्हणाले की, 1999 मधील स्व. बाळासाहेबांना भेटण्यासाठी प्रकाश जावडेकर आले असता बाळासाहेब आराम करत होते. त्यावेळी त्यांनी मला विषय सांगितलां आणि त्यांचा निरोप घेऊन मी बाळासाहेबांकडे गेलो. बाळासाहेबांना झोपेतून उठवत प्रकाश जावडेकर हे भेटण्यासाठी आले आहेत. असा निरोप दिला त्यावेळी म्हणाले काय म्हणतायत. यावर मी म्हटलं ते मुख्यमंत्री पदाचा विषय मिटलाय सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करण्यास संमती आहे. त्यावर बाळासाहेब म्हणाले जाऊन सांग त्यांना या मराठी माणुसच या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. मराठी अभिमानासाठी सत्तेला लाथ मारणार्या बाळासाहेबांचे संस्कार ज्या मुलांवर आहेत त्यांना हे मराठी शिकवणार का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी सत्ताधार्यांचे वाभाडे काढले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रमाणेच ‘सन्माननिय’ राज ठाकरे अशीच भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे प्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणालाही उपस्थितांनी टाळ्या आणि घोषणांनी प्रतिसाद दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदी भाषेची सक्ती करताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच सक्ती केल्याचे फेक नेरेटिव्ह पसरवतात. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली, काय केलत तुम्ही त्याचं?. आम्ही एकत्र येणार, आणि आल्यावर आमचा ‘म’ महापालिका पुरताच असल्याचा नेरेटिव्ह पसरवला जातोय पण मी त्यांना सांगू इच्छतो की आमचा ‘म’ महानगरपालिकेचा नाही तर महारष्ट्राचा ‘म’ आहे आम्ही महाराष्ट्र काबीज करू. आमच्यातला आंतरपाट आण्णाजी पंतांनी दूर केला म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली.
भापने मागिल विधानसभेत काय केलं, बटेंगे तो कटेंगे हे हिंदु-मुस्लिमामध्ये तर केलंच पण बटेंगे तो कटेंगे हे मराठी- मराठीमध्ये केलं. तोडा, फोडा आणि राज्य कराची नितीचा अवलंब केला. गुजरात पटेल, हरियाणात जाट आणि महाराष्ट्रात तेच करत मराठी-मराठी माणुस मराठी माणसांशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या माथ्यांवर बसवल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी पंतप्रधान यांच्या विदेश दौर्याची खिल्ली उडवत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे पंतप्रधान जगभर फिरतात काय तो पट्टा घातला, इकडे आमचा शेतकरी बैल मिळत नसल्याने नांगराच जोखड गळ्यात घालून नांगर ओढतोय, आणि तिकडे स्टार ऑप खाना काय लाज वाटली पाहिजे. जगातील सर्वात जास्त कर्जबाजारी शेतकरी महाराष्ट्रात. भाजपच्या महाराष्ट्र आता थांबणार नाही या घोषणेचा समाचार घेत ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार’ असा उपारोधक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ नार्याचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले की, काल- परवा एक गद्दार बोलला ‘जय गुजरात’ यावेळी त्यांनी पुष्पा चित्रपटामधील झुकेगा नही डायलांग म्हणत ‘उठेगा नही साला’ असा मिश्किलीने समाचार घेतला. मालक आला म्हणून ‘जय गुजरात’ म्हणणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आम्ही एकत्र आलो महाराष्ट्र, मराठीसाठी अगदी भाजपमधल्या मराठी माणसांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे. हा ‘प्रीमियर’ आहे, पण आज पासून सुरुवात झाली आहे, कोणी दादागीरी केली, तर सहन करणार नसल्याचा इशारा देत मराठी माणसाची एकजूट बांधण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. यावेळी उपस्थित कॉ. प्रकाश रेड्डी, खासदार सुप्रिया सुळे, कॉ. अजित नवले, रासपचे महादेव जानकर, शेकापचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, आमित ठाकरे, दिपक पवार, आमदार निकोले, श्री. मोडवेकर यांना व्यासपीठावर बोलावून एकजूटीने हात उंचावले.
Comments