top of page

अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल आला, तांत्रिक बिघाड, लँडिंगचा अँगलच चुकला?

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज दहा दिवस होत आहेत, त्यांचे विमान कसे कोसळलं या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरीत आहे. या अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. वैमानिकाचा अंदाज चुकला असल्याची माहिती चौकशी समितीतून समोर येत आहे एएआयबी कडून हा तपास सुरू आहे.


बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजितदादांचे विमान कोसळलं अन् या अपघातात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अतिशय हायप्रोफाईल आणि गंभीर अशा या विमान अपघातांची तीन टप्यात चौकशी होत आहे.


कोणत्याही विमान दुर्घटनेनंतर त्याची प्रोटोकॉलनुसार चौकशी केली जाते. त्याचप्रकारे अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता सुरु झाली आहे. त्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. त्याचं काही निरीक्षण नोंदवण्यात आली आहे. यात मोठी माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या विमान अपघात केवळ तांत्रिक बिघाडामुळे झाला नाही असे सुत्रांनी सांगितले. या विमानाच्या लँडिंगचा अँगल चुकला होता, अशी माहिती समोर येत आहे. अपघाताचा प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली आहे.


जेव्हा पायलटने लँडिंग करण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा नियंत्रण प्रणालीत अचानक काहीतरी बिघाड झाला त्यामुळे लँडिंग करण्याची दिशा चुकली असावी, अशी निरीक्षण या अहवालात नोंदवली गेली आहेत. हा संपूर्ण अहवाल येण्यास काही दिवस बाकी आहे, हा केवळ प्राथमिक अहवाल असून सखोल चौकशीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 28 जानेवारीला हा अपघात झाला होता. हे विमान धावपट्टीच्या सुरवातीच्या डाव्या बाजूला कोसळलं होतं, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी विमानाचा ब्लक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर यांमधील डेटाचे सविस्तर विश्लेषण केले जाणार आहे.


तांत्रिक बिघाड नेमका कोणत्या क्षणी सुरू झाला आणि वैमानिकाचे अखेरच्या क्षणी काय संभाषण झाले, यावरून अनेक महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या सर्व तांत्रिक पुराव्यांच्या तपासणीनंतरच अपघाताचे अंतिम कारण स्पष्ट होईल. त्याला 10 ते 12 महिने लागण्याची शक्यता आहे.


विमान अपघाताची चौकशी डीजीसीए करीत आहे. चौकशीसाठी ‘डीजीसीए’ ने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आपला प्राथमिक चौकशी अहवाल 15 फेब्रूवारीपर्यंत सादर करणार आहे. अजित पवार यांना विमान पुरवणार्‍या ‘ व्हीएसआर व्हेन्चर्स’ या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश डीजीसीएने दिले आहेत.

Comments


bottom of page