अजित दादांच्या विमानाचं सीसीटिव्ही नाकारलं, लवकरच प्राथमिक अहवाल समोर येणार?
- Navnath Yewale
- Feb 20
- 1 min read

मुंबई : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवरुन सातत्यानं घात की अपघात हा प्रश्न समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषदे घेऊन या संशयाचं धुकं वाढवलं असतानाच अजून एक घटना समोर आली आहे. बारामतीच्या नितीन यादव यांनी आरटीआयच्या माध्यमतून अजितदादांच्या अपघाताआधी मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाकडे केली. मात्र 28 जानेवारीचे हे सीसीटिव्ही फुटेज देण्यास मंत्रालयानं नकार दिल्यानं संशयाचं धुकं अधिक गडद होत चाललं आहे.
अजितदादांच्या अपघातानंतर मुंबई विमानतळासह देवगिरी बंगल्यावरील सीसीटिव्ही फुटेजही अद्याप समोर आलेले नाहीत. त्यामुळे अपघाताआधीचे अजित पवारांचे देवगिरी पासून विमानतळापर्यंतच्या प्रवासाचे सीसीटिव्ही सार्वजनिक करावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
दरम्यान, विमान अपघाताची नियमांनुसार चौकशी सुरु असून एएआयबी तांत्रिक आणि पुरव्यांवर आधारित तपास करत आहे. एकीकडे उच्च तापमानामुळे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचं नुकसान झालेलं असताना दुसरीकडे डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड झाल्याचं नागरी हवाई मंत्रालयाने सांगितलं आहे.
आता 28 फेब्रूवारीपूर्वी अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर येणार आहे. त्यामुळे प्राथमिक अहवालात नेमकी कोणती माहिती समोर येणार? दादांचं देवगिरी बंगल्यावरील आणि मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिकरित्या उघड केले जाणार का? असा अनेक प्रश्नांची उत्तर मिळणं आता राज्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.



Comments