top of page

अजित पवारांकडून कस्पटे कुटुंबीयांचे सांत्वन; कुठल्याही आरोपीला राजकिय पाठबळ मिळणार नाही



वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्ये प्रकरणात कुठल्याही आरोपींना राजकिय पाठबळ मिळणार नाही. वैष्णवीला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवले जाईल, पिंपरी चिंचवड पोलिसांनी अतिशय संवेदनशीतेन हे प्रकरण हातळल्याचे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.


पिंपरी-चिंचवड पोलिसांवर टीका होत असताना अजित पवारांनी पिंपरी -चिचवड पोलिसांनी चांगली कामगिरी करत आरोपीला बेड्या ठोकल्याचे उद्गार काढले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना याबाबत कोणाचीही गय न करण्याची आणि राजकीय हस्तक्षेप होणार नाही. याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. पिंपरी -चिंचवड पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे हे प्रकरण हाताळत आरेापींना अटक केली आहे.


पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना कुणाचीही गय न करण्याचे आदेश दिले होते. राजकीय हस्तक्षेप होणार नाही. याची काळजी घेण्यास सांगितले होते. हस्तक्षेप होणार नाही. याची काळजी घेण्यास सांगितले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आधीच तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तपास करणार्‍या अधिकार्‍यांशी बोललो. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे वारंवार लोकेशन बदलत होते. गाडी बदलत होते. तरी देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी जुळवाजुळव करून चांगली कामगिरी करत आरोपींना अटक केली. हे प्रकरण फास्टॅ्रक कोर्टात चालवल जाणार असून तातडीने निकाल लागेल अशी अपेक्षा आहे.


निलेश चव्हाण प्रकरणी पुणे सीपी यांच्याशी माझं बोलणं झाल असून त्या प्रकरणात त्याच्यांवर कठोर करवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एकूणच हे सगळं प्रकरण बघता ही केस स्ट्राँग केली जाईल. पोलिस योग्य दिशेने तपास करत आहेत. असं कस्पटे कुटुंबांच म्हणणं असल्याचे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. हत्येचा गुन्हा दाखल केला आणि पुरावे नसतील तर ती केस स्ट्रँग राहणार नाही . त्यामुळे पुराव्याच्या आधारे हे प्रकरण हाताळले जात असल्याचे देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. हे प्रकरण संवेदनशील असून त्यांचा या प्रकरणात दबक्या आवाजात सहभाग असल्याचे बोलले जात असून फोन कनेक्शन आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशराही अजित पवार यांनी दिला.

Comentarios


bottom of page