top of page

अण्णामलाईची लूंगी काढणार्‍यास लाखाचे बक्षीस! शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्याचे आव्हान, ‘ हटाव लूंगी, बजाव पुंगी’ ची घोषणा

मुंबई: भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबईमध्ये येऊन वादग्रस्त वक्तव्य केलं. मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नसून हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. असं विधान केलं होतं. अण्णामलाईच्या याच वक्तव्यावरून ऐन महापालिका निवडणुकीच्या प्रचारात वाद उफाळला.

यावरून ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी अण्णामलाईची लुंगी काढणार्‍याला तब्बल एक लाखांचं बक्षीस देण्यात येईल अशी घोषणाच केली आहे. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर अण्णामलाई मुंबईत एक पाय ठेवण्याच्या प्रयत्न करशील तर तुझे दोन्ही पाय तोडण्यात येतील आणि जीभ हसडण्यात येईल, असा ईशाराही शदर कोळी यांनी दिला आहे.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी भाजप नेते अण्णामलाई यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यांनी मुंबईवरून केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. शरद कोळी म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्राबाबत बोलण्याचा त्यांना कसलाही अधिकार नाही, अण्णामलाईच्या या अक्षेपाहार्य विधानाने तमाम मराठीमाणसांसह शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत.


शिवाय अण्णामलाईंच्या भाषेवरही कोळी यांनी आक्षेप घेत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या एकेरी टीकेला प्रत्यूत्तर देत कोळी यांनी ‘ उठाव लुंगी, बजाव पुंगी ’ अशी घोषणा देत आण्णामलाईची लुंगी काढणार्‍याला लाखाचे बक्षीसही जाहिर केले. शिवाय कोळी यांनी अण्णामलई यांनी मुंबईत येण्याची भाषा केल्यास त्याला जोरदार प्रत्यूत्तर दिले जाईल असा इशाराही शरद कोळी यांनी दिला.


अण्णामलाईचं राज ठाकरेंना अव्हान :

भाजप नेते अण्णामलाई यांनी मुंबई ही केवळ महाराष्ट्राची राजधानी नाही तर ती देशाची आर्थिक राजधानी आणि एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे हे शहर योग्य लोकांनी चालवले पाहिजे अशी टिप्पणी केली होती. यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांच्यावर टीका करताना ‘एक रसमलाई तामिळनाडूतून आली आहे... तुझा इथे काय संबंध? ‘हटालो लुंगी, बजाव पुंगी’ असं प्रत्युत्तर दिलं होतं. आता अण्णामलाई यांनी राज ठाकरेंना आव्हान देतानाच ‘मी मुंबईला येईल माझे पाय कापून दाखवा’ असं आव्हान दिलं आहे.

Comments

Couldn’t Load Comments
It looks like there was a technical problem. Try reconnecting or refreshing the page.
bottom of page