top of page

अधिवेशनाच्या तोंडावरच अंजली दमानियांचे ट्विटरास्त्र!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘धूर्त’ असल्याचं ट्विट


राज्यात त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करत महायुती सरकाराने पहिलपासून हिंदी भाषा सक्ती लागू केली आहे. सरकारच्या हिंदीसक्ती विरोधात वादंग निर्माण झाला आहे. अधिवेशन काळात ठाकरे बंधुचे हिंदीसक्ती विरोधात 5 जुलैला मोर्चाचे आयोजन आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनीही ट्विटरास्त्र सोडून खळबळ उडवून दिली आहे.


आगामी पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुती विरुद्ध विरेाधी बाकावरील महाविकास आघाडी असा संघर्ष पहायला मिळणार आहे. दरम्यान या अधिवेशनातच शेतकरी कर्ज माफी, शेती मालाला हमी भाव, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, मोफत विज आदी प्रश्नांसह हिंदीसक्तीच्या मुद्यावरून विरेधाक सत्ताधारी महायुती सरकारला घेरण्याचा अंदाज आहे. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शनिवारी (28 जून) केलेलं ट्विट चर्चेचं ठरत आहे.


अंजली दमानिया यांनी आपल्या एक्स पोस्टवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धूर्त असल्याचं म्हटलं आहे. अंजली दमानिया ट्विटमध्ये म्हणतात, ‘देवेंद्र फडणवीस यांना खूपच धुर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि विरोधी पक्षाला खेळवतात. मागच्या अधिवेशनात झटका, हलाल आणि औरंगजेबाची कबर हे विषय होते. यावेळी हिंदी भाषेचा विषय पुढे करून विरोधी पक्षाला गुंतवून ठेवणार म्हणजे कोणीच खरे प्रश्न विचारायला नको, असं त्यांनी म्हटलं आहे.


महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 30 जून ते 18 जूलै या काळात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अधिक बहुमताने सत्तेत परतलेल्या महायुती सरकारकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. तेवढ्या जोमात विरोधकांच्या गोटात हालाचाली दिसून येत नाहीत. काँग्रेस च्या गोटात नाना पटोले, विजय वडेट्टीवर सोडले तर आवाज उठवणारा जानकार नेता तुर्तास पुढे आलेला नाही. राष्ट्रवादी (श.प) गोटातही सत्ताधार्‍यांना घेरण्यासाठी अवश्यक तयारी दिसून येत नाही. शिवसेना (उ.बा.ठा) गोटात मोर्चाची तयारी सुरू आहे. त्यामुळे सत्ताधार्‍यांना विरोधक कसे कोंडीत पकडणार ? हा प्रश्न आहे.


राज्यात महिला सुरक्षा, गुन्हेगारी, शेतकरी कर्जमाफी यासह अनेक वादाचे मुद्दे गाजत आहेत, या सगळ्या मुद्यांवरून अल्पमतात महाविकास आघाडीकडे सरकारला घेरण्याची मोठी संधी आहे. त्यातही पावसाळी अधविशेनात प्रामुख्याने सध्या गाजत असलेल्या शाळांमध्ये पहिलपासूनची हिंदी भाषेची सक्ती या विषयावरून राज्य सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यातील शाळांमध्ये तिसरा विषय म्हणून हिंदी भाषेला पुरक असे धोरण घेतले होते. या धोरणाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच हाच मुद्दा उचलून धरत ठाकरे बंधूनी एकत्रित येण्याच्या उद्देशानं पहिलं पाऊल टाकल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येत्या अधिवेशन काळात हिंदीसक्तीचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. याच मुद्यावरून सरकार बॅकफूटला जाऊ शकते,असे जानकारांचे म्हणणे आहे.

Commentaires


bottom of page