अफगणिस्तानचे लष्कर पाकिस्तानमध्ये घुसले, तालिबानचा क्वेटा- पेशावरवर दावा; दुहेरी हल्ल्याने दक्षिण आशियात खळबळ
- Navnath Yewale
- May 29
- 1 min read

आफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील तणाव आता उघड संघर्षात बदलला आहे. बलुचिस्तानमधील चाघी जिल्ह्यात अफगाण सैन्याने घुसखोरी करत भीषण गोळीबार केल्याने अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला जात आहे. ज्यामुळे या भागात युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बलुचिस्तानमधील चाघी जिल्ह्यातून गुरुवारी समोर आलेल्या दृश्यांमुळे दक्षिण आशिया आणखी एका मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दिर्घकाळापासून असलेला तणाव आता एक उघड संघर्षात बदलला आहे.
अफगाणिस्तानच्या सैन्याने पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला असून दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, सीमेवर ‘युद्धासारखी परिस्थिती’ निर्माण झाली आहे.
चाघी हा तोच परिसर आहे जो बलुचिस्तानमधील ड्युरंड लाईनजवळ वसलेला आहे. याच ड्युरंड लाईनला अफगाण तालिबानने आता ‘अवैध’ घोषित केले आहे. याच ठिकाणाहून अफगाण सैनिकांनी पाकिस्तानात घुसखोरी केल्याची खात्री झाली आहे. स्थानिक सूत्रांनुसार या गोळीबारात अनेक पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. मात्र पाकिस्तानकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
Comments