top of page

अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा; आई - वडिलांनी सरकारला सुनावले

आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले . यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला, तर आंदोलनप थांबणार नसल्याचा इशारा देत त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. अभिजीत दीपके यांच्या या निर्णयानंतर त्यांच्या आई-वडीलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली.


नीट परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अभिजीत लढा देत आहे. त्याच्या नातेवाईक अथवा नात्यातील भावा-बहिणींसाठी तो लढत नाही. तो सर्वांसाठी लढा देत आहे. पण सरकार या आंदोलनाची कुठलीच दखल घेत नसणल्याचा आरोप अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी केला. तो धडपड करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो लढा देत आहे.6 जून रोजी तो अर्धा तास तो घरी आला. सोनम वांगचुक यांना सरकारने उचलून नेले, ते चुकीचे केले आहे. सरकारला एकच सांगणे आहे की, मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याचे वडील दवाखान्यात दाखल होते, गेल्या शनिवारी अभिजीतशी बोलणे झाले. अशात त्याच्याशी बोललो नसल्याच आईने सांगितले.


अभिजीत आमरण उपोषणाला बसला आहे. आमचा जीव कसा लागणार? असे म्हणत त्याच्या आईचा कंठ दाटून आला. आज सोनम वांगचुक यांना नेले. उद्या त्यालाही असे उचलून नेले तर आम्ही काय करणार? वांगचुक यांना सकाळीच झोपतून उचलून नेले. उद्या अभिजीबाबत असे झाले तर आम्ही काय आणि कुणाकडं न्याय मागणार असा सवाल अभिजीतची आई अनिता दीपके यांनी केला. त्यांनी मुलाविषयी मोठी चिंता व्यक्त केली.


ही तर हुकूमशाही झाली : ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तिथे कुठलीही हिंसा झाली नाही. जनता त्यांच्या बाजूने होती. दिल्ली आणि देशातील अनेक जण दिल्लीत त्यांची काळजी घेत होता. सरकारने सोनम वांगचुक यांनाअशा प्रकारे अचानक उचवलून न्यायची गरज नव्हती. सरकारने प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. ही तर हुकूमशाही झाली ना. वांगचुक हे मोठे वैज्ञाणिक आहेत. त्यांनी देशाचा विचार करून उपोषणाला बसले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पाठिंबा दिला. वांगचुक यांना उचलून नेले म्हणजे हे आंदोलन संपवून जाईल असे सरकारला वाटत होते. सरकारला हे आंदोलन मोडून काढायचे आहे. त्याला अमेरिकेत चांगली नोकरी मिळत होती. मी ही त्याला सांगितलं होतं की भारतात गढूळ वातावरण झालेले आहे, इकडे येऊ नको. राम मंदिर सोडलं नाही तर इतर माणसांची काय चिंता आहे या देशात? पण त्याने ऐकले नाही, असे अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त केले.

सरकारला मला काही सांगायचं नाही, नरेंद्र मोदी यांना देवाने सुद्बद्धी द्यावी की विद्यार्थ्यांचं ऐकण्याची सद्बुद्धी द्यावी. वडील म्हणून कोणालाही मुलाची चिंताच वाटते मला जशी मुलांची चिंता वाटते, तशी नरेंद्र मोदींना त्यांच्या विद्यार्थी हे मुलं म्हणून त्यांना चिंता वाटायला पाहिजे त्याच्यात गैर काय आहे. भिण्याचे काही कारण नाही जन्माजात यांच्या बापाची खुर्ची नाही. हे किती वर्षे तिथे जाणार ही लोकशाही आहे पाच सत्ता फ्लॅट होते हे आपण बघितलं आहे. एखाद्य मंत्र्यांना काढलं असतं तर यांचे काही मंत्रिमंडळ कोसळत नव्हतं. सर्वांनीच आता सरकारच्या विरोधात रस्त्यावर आले पाहिजे, असे आवाहन अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांनी केले.


अभिजीत दीपके उपोषणाला बसला आहे. आम्ही सुद्धा त्याच्या आंदोलनात सहभागी होऊ. मला एकच मुलगा आहे तो जर उपोषणाला बसला तर मी इथे बसून काय करणार, अशी प्रतिक्रिया अनिता दीपके यांनी दिली.तर मी पण उपोषणाला जाणार आहे सरकारला काळजी नाही मात्र आम्हाला आमच्या लेकराची काळजी आहे, असे भगवानराव दीपके म्हणाले

Comments


bottom of page