top of page

अमरनाथ यात्रेत रस्ता आपघात; पहलगामकडे जाणार्‍या 5 बसेस एकमेकांवर आदळल्या


अमरनाथ यात्रेदरम्यान, जम्मू- काश्मिरमधील रामबन जिल्ह्यातील चंदरकोट भागात पहलगामकडे जाणार्‍या यात्रेकरूंच्या पाच बस एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाही घडला. या सर्व बस एकाच ताफ्याचा भाग होत्या आणि अमरनाथ गुहेकडे निघाल्या होत्या.


या भिषण अपघातात महिला, पुरुष आणि निष्पाप मुलांसह किमान 36 प्रवासी जखमी झाले. अपघातानंर लगेचच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व जखमींना रामबन येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिथे त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. अपघातामुळे यात्रेच्या या टप्यावर तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

रामबनचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक कुलबीर सिंह यांनी अपघाताची माहिती देताना माध्यमांना सांगितले की, भाविक नाश्त्यासाठी थांबत असताना झाला. मध्य प्रदेशहून आलेल्या खासगी बसच्या ताफ्याची शेवटची बस अचनाक चार उभ्या असलेल्या बसेसना धडकली. प्राथमिक तपासात ब्रेक फेल झाल्याचे दिसून येते. एका बसची टक्कर होताच उर्वरित बसेसचेही एकामागून एक नुकसान झाले.


बहुतेक जखमींना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्यांना उपचारानंतर प्रवास पुन्हा सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी नवीन वाहनांची व्यवस्था केली जात आहे. तीन ते चार प्रवाशांची प्रकृती अशी आहे की, ते प्रवास सुरू ठेवू शकणार नसल्याचेही पोलीस अधिक्षक कुलबीर सिंह म्हणाले.


अपघाताची माहिती मिळताच, रामबनचे उपायुक्त इलियास खान स्वत: जिल्हा रुग्णालयात पोहोचले आणि जखमींची भेट घेतली. त्यांनी रुग्णालयात पुरवल्या जाणार्‍या वैद्यकिय सुविधांची पाहणी केली आणि डॉक्टरांना सूचना दिल्या की, कोणत्याही जखमींच्या उपचारात कमतरता पडू नये, प्रशासनाने यात्रेकरूंसाठी पर्यायी बसेसची व्यवस्था वेगाने सुरू केली आहे.


आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अमरनाथ यात्रेच्या चौथ्या तुकडीत एकून 6,979 भाविकांचा समावेश करण्यात आला. पवित्र अमरनाथ गुहेची यात्रा दोन मार्गांनी केली जाते. भाविक अमरनाथ गुहेत मार्गांनी प्रवास करतात, त्यापैकी एक पारंपाकि पहलगाम मार्ग आहे. हा मार्ग 48 किमी लांब आहे. शनिवारी या मार्गावरून 161 वाहनांमध्ये 4,226 यात्रेकरू निघाले दुसरा बालटाल मार्ग आहे . जो लहान (14 किमी) आहे उंची जास्त आहे आणि कठीण आहे. या मार्गावर 151 वाहनांमध्ये 2,753 यात्रेकरू प्रवासाला निघाले.


पोलीसांनी सांगितले की, अपघातामुळे राष्ट्रीय महामार्ग -44 वरील काही काहासाठी प्रभावित झाली होती. परंतु नंतर व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. या अपघाताबाबत पोलीस तपास सुरू आहे. ब्रेक फेल होणे हे निष्काळजीपणामुळे होते की, तांत्रिक बिघाडामुळे हे स्पष्ट करण्यासाठी बसच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत.


या दुर्दैवी घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, अमरनाथ याता जितकी श्रद्धेची आहे, तितकीच सुरक्षितता आणि दक्षता देखील आवश्यक आहे. प्रशान आणि पोलीसांनी वेळीच परिस्थिती हाताळली आणि मोठे नुकसान टाळले. सर्व प्राधान्य आहे आणि या अपघातातून धडा घेत, भविष्यात यात्रा मार्गांवर अधिक दक्षता घेतली जाईल.

Comments


bottom of page