top of page

अमेरिकेचा पुन्हा टॅरिफ बॉम्ब, डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेने जगभरात खळबळ

अमेरिका आणि इराणमध्ये अजूनही संघर्ष सुरूच आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये तब्बल 40 दिवस युद्ध सुरू होतं. अखेर पाकिस्तानच्या मध्यस्थिने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केली. मात्र जरी युद्धविराम झाला असला तरी देखील अजूनही या दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव आहे. एकीकडे इराणने युुद्धाच्या पार्श्वभूमीवर स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला होता. तो अजूनही बंदच आहे. त्यात भरीसभर म्हणजे अमेरिकेनं देखील या मार्गावर नाकेबंदी केली आहे. त्यामुळे सध्या संपर्णू जगावर मोठं उर्जा संकट निर्माण झालं आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद असल्यामुळे मध्य पूर्वेतून येणारं कच्च तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे स्ट्रेट ऑफ होर्मुज बंद केला आहे, तर दुसरीकडे पुन्हा एकदा टॅरिफच्या घोषणेनं जगभरात खळबळ उडवून दिली आहे.


जर्मनीविरोधात आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर्मनीमधून आपलं सैन्य माघारी बोलवण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी त्यांनी असं वक्तव्य केलं होतं की, जर्मनीमध्ये अमेरिकेचे केवळ 5 हजार सैन्यच राहील. मात्र आता त्यांनी आपला निर्णय बदलला आहे. जर्मनीमध्ये आता पाच हजारांपेक्षाही कमी सैन्य अमेरिका ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केली आहे. त्यांनी युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांमध्ये निर्माण होणार्‍या कार आणि ट्रक यांच्यावर तब्बल 25 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा सर्वाधिक फटका हा जर्मनीला बसणार आहे. कारण जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात कार आणि वाहनांची निर्मीती होते.


डोनाल्ड म्हणाले की, युरोपियन युनियनने व्यापारी करारांच्या अटींच पालन केलं नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यापासून युरोपियन युनियनचे जे सदस्य देश आहेत, त्या देशांमध्ये तयार होणार्‍या कार आणि ट्रकवर 25 टक्के टॅरिफ आकारला जाईल. ते फ्लोरिडामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. दरम्यान आता हा अमेरिकेचा जर्मनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Comments


bottom of page