top of page

अवघे गरजे पंढरपुर। चालला नामांचा गजर ॥ आषाढी वारी: वैष्णवांच्या मेळ्याने दुमदुमली पंढरी...

यंदाच्या शासकीय महापूजेला उगले दम्पत्याचा मान, मुख्यमंत्री फडणवीसांचे सपत्नीक विठ्ठल-रुख्मिणी मातेला साकडे; बा..विठ्ठला ... शेतकरी कष्टकर्‍यांना सुख-समृद्धी मिळू दे...


आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांच्या मेळ्याने पंढरपूर सजले. वारकर्‍यांच्या भक्तीला उधाण आले आहे . आषाढ धारा कोसळत असताना भक्तीरसात वारकरी चिंब झाले. विठ्ठल दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून वारकर्‍यांची पावले पंढरपूरकडे वळली. त्यामुळे यंदा सुमारे 20 लाख भविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. विठू नामाचा जयघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमली आहे. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे सपत्नीक विठ्ठल-रूख्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यंदाचा शासकिय पूजेसाठी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील कैलास उगले व कल्पना कैलास उगले या दांम्पत्याला मान मिळाला. गेल्या पंधरा वर्षापासून ते वारीला येत आहे. मुख्यमंत्री आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल आणि विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.


आषढी एकादशीनिमित्त मुख्य मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारीच पंढरपुरात दाखल झाले होते. पंढरपूर येथे विठ्ठल-रुख्मिनी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा यांच्यासह संपन्न झाली. राज्यात शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार:

शनिवारी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी आस लावून पंढरपूर येथे पोहोचतात. वारी दरम्यान वारकर्‍यांना येणार्‍या अडचणीचा विचार करून 2018 वर्षीपासून निर्मलवारी सुरुवात केली. या अंतर्गत पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छातागृहाची व्यवस्था करण्यात आली. जी पावले विठुरायाच्या दर्शनाच्या आशेने चालतात, त्या पावलांची सेवा करून विठुरायांच्या चरणी सेवा केल्याचा प्रत्यंतर यावा, या सेवाभावाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्यावतीने चरणसेवा उपक्रम राबवून वारकर्‍यांची सेवा केली. त्यांचे आरेाग्य व्यवस्थीत ठेवण्याचे काम केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंढरपूर कॉरिडोरसाठी सर्वांना विश्वासात घेणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला योवळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य, मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, वारीची पंरपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिाकणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकारी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकर्‍यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकार्‍यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकार्‍यांसाठी चांगली व्यवस्था झाली आहे.


आषाढी एकादीशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आल. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो. ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेच नाही. वारीत हरीनामाचा गजर करताना नवी ऊर्जा मिळते. वारीने खर्‍या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे. असे सांगून मानाच्या वारकर्‍यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री फडणवीस यांनी व्यक्त केली.


निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खर्‍या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


तत्पुर्वी श्री विठ्ठल रूख्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्ताविक केले. यामध्ये यावर्षी आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकर्‍यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकार्‍यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे सांगितले.


यावेळी शासीय महापूजेचे मानाचे वारकारी नाशिक जिल्ह्यातील जातेगांव (ता. नांदगांव) येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.



निर्मल दिंडी पुरस्काराचे वितरण:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पायी स्वच्छता आणि सामाजिक विषयांवर प्रबोधन करणार्‍या दिंड्यांचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रथम क्रमांक श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 13, जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा द्वितिय क्रमांक - बाळकृष्णबुवा वारकरी दिंडी क्रमांक 19, श्री संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळा. तृतिय क्रमांक श्री गुरू बाळासाहेब आजरेकर दिंडी क्रमांक 23, श्री संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी सोहळा यांना

Comments


bottom of page