अवादा कंपणीत चोरी, आकाची टोळी सक्रीय - आ. सुरेश धस
- Navnath Yewale
- Apr 9
- 1 min read

अवादा कंपणीचे विडा परिसरातून तेरा लाख रुपये किमतीच्या केबल चोरीे प्रकरण समोर आले आहे. यावर आमदार सुरेश यांनी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे. आका जेलमध्ये असला तरी त्याची गँग सक्रिय आहे. पोलिस प्रशासनातील आकाच्या मर्जीतल्या पोलिसांच्या बदल्या झाल्या नाहीत. त्यामुळे आकाच्या टोळीचे कारनामे सुरु असल्याचे धस म्हणाले.
संताष देशमुख यांच्या निर्घुण हत्ये नंतर हत्येस कारणीभूत ठरलेली अवादा कंपणी खंडणी प्रकरणावरुन चर्चेत आली. मस्साजोग (ता.केज) येथे अवादा कंपणीच्या स्टोअर प्लँट अंतर्गत विडा (ता. केज) परिसरात पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. मंगळवारी विडा येथे कंपणीच्या साईटवर रात्री अज्ञात 14 ते 15 लोक तोंडाला मास्क बांधून आले. यावेळी तैंनातीत असलेल्या दोन्ही सुरक्षारक्षकांचे हात- पाय बांधून आरोपींनी तेरा लाख रुपये किंमतीचे केबल लंपास केले.
कंपणीच्या वरिष्ठांनी केज पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष हजर होवून प्रकरणाची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात 14 ते 15 आरोपींच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांच्यावर निशाना साधला आका जेलमध्ये असला तरी त्याची टोळी सक्रिय असल्याचे ताजे उदाहरण आहे. आकाच्या मर्जीतील पोलिस प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत म्हणत आमदार धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर ही प्रत्यक्ष टोला लगावला.
Comments