top of page

अशी पकडली गेली ज्योती मल्होत्रा; भारतीय लष्कराची रहस्ये काढायची, नंतर पाकगुप्तचर यंत्रणेपर्यंत पोहोचवायची




“ भोळ्या चेहर्‍यावर जाऊ नका” अशी एक म्हण नेहमीच बोलली जाते. काहींस असंच पाकिस्तानी जासूस यूट्यूबर ज्योती मल्होत्रासोबतही आहे. तिचा भोहा चहरा कोणालाही मोहित करू शकतो. तिची बोलण्याची शैली आणि हावभाव असे की, तिच्यासमोर कोणीही घायाळ होईल. यूट्यूबर ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी जासूसी करताना तिच्या चेहर्‍याची निष्पापता आणि भावभावांचा पुरेपूर वापर केला. याचा तिला फायदाही झाला.


दिल्लीपासून अंबाल्यापर्यंत आणि लाहोरपासून कराचीपर्यंत तिचे अनेक मित्र बनले. पोलिस सूत्रांनुसार, पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशच्या जाळ्यात आडकली. त्यानंतर पाकिस्तानात पोहोचल्यानंतर दानिशच्या सहाय्याने ती तिथल्या यंत्रणेतली अनेक अधिकार्‍यांच्या संपर्कात आली.


असे सांगितले जाते की, ज्योती पाकिस्तानात अशा प्रकारे हावभाव दाखवायची की, अधिकारही तिच्याभोवती फिरायचे. तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, 2020 पूर्वी ती दिल्लीत एका छोट्या संस्थेत नोकरी करायची, जिथे तिला फक्त 20 हजार रुपये पगार मिळायचा तरीही ती 12 हजार रुपये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून ऐषोआरामाचे जीवन जगायची. ज्या वेळी तिच्या फ्लॅटचे वीज बिलच चार ते पाच हजार रुपये यायचे. एवढ्या कमी पगारातही ती अनेकदा मोठमोठ्या हॉटेलांमध्ये जायची.


अशी आली रडारवर

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या, सूत्रांनुसार याच दरम्यान एक संदेश टॅ्रप झाला होता. हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता. या संदेशाच्य डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. त्यावेळी ज्योतीच्या निष्पाप चेहर्‍याकडे पाहून स्थानिक पोलिसांना ती पाकिस्तानी जासूस असल्याचा विश्वासच बसत नव्हता, पण तिच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स, फोटो-व्हिडीओ, स्नॅपचॅट आणि टेलीग्रामपरील चॅटिंग पाहून पोलिसांचेही होश उडाले.


ज्योतीचे साथीदारही अटकेत:

सध्या पोलिसांनी ज्योतीला कोर्टात हजर करून पुढील तपासाठी पाच दिवसांच्या कोठडीत घेतले आहे. तसेच, ज्योतीच्या सूचनेनूसार आणि ओळखीच्या आधारावर तिचा साथीदार अरमानला नूहं मेवातमधून अटक करण्यात आली आहे. अमरमानलाही पोलिसांनी कोर्टात हजर करून सहा दिवसांच्या रिमांडवर घेतले आहे. याचबरोबर हरियाणातील पानीपत येथून नोमान इलाही आणि कैथल येथून सिंह ढिल्लो यांनाही पकडण्यात आले आहे. पोलिस या सर्वांची कसून चौकशी करत आहेत.


जासूस बनण्याची कहाणी समोर: यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे वउील हरीश मल्होत्रा स्वत: आश्चर्यचकित आहेत की त्यांची मुलगी पाकिस्तानची जासूस आहे. त्यांना तर हेही माहित नाही की ती कोणकोणत्या देशांमध्ये फिरली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना फक्त एवढेच माहित आहे की ती व्हिडीओ बनवते आणि युट्यूबर टाकते, ज्यामुळे तिला पैसे मिळतात. पण यूट्यूबवरून तिला किती कमाई होते, हेही त्यांना माहित नाही. हरीश मल्होत्रा यांनी सांगितले की, त्यांचा ज्योतीच्या आईपासून घटस्फोट झाला आहे.


घटस्फोटानंतर ज्योती दिल्लीत राहून नोकरी करू लागली होती. लॉकडाऊनमध्ये तिने नोकरी सोडली आणि घरी आली. तेव्हापासून ती व्हिडिओ बनवत आहे. त्यांनी आपली मुलगी निर्दोष असल्याचे सांगितले, पण असा संशय व्यक्त केला की, व्हिडिओ बनवताना पाकिस्तानी अधिकार्‍यांच्या संपर्कात आली असावी.

Comments


bottom of page