top of page

अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार

इच्छा नसताना पीडितेला पैसे देत आरोपींनी तिच्या घरी जाऊन अश्लिल फोटो काढला. पैसे परत दिल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोन्ही आरोपींनी पीडितेवर अत्याचार केला.


अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्या प्रकरणी उरुळी कांचन पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. राजेश लक्ष्मण चौधरी आणि सुरज भालचंद्र चौधरी दोन्ही राहणार पेठ, ता. हवेली, जि. पुणे अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका अठ्ठावीस वर्षीय पीडितेने फिर्याद उरुळी कांचन पोलीसांत फिर्याद दिली आहे.


पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश चौधरी हा सावकारकी करतो तर सुरज चौधरी हा पेठ गावचा माजी सरपंच आहे. राजेश याने पीडितेची इच्छा नसताना औनलाईन पद्धतीने आठ लाख रुपये दिले होते. राजेश याने पीडितेच्या नकळत घरी जाऊन अश्लील फोटो काढला. त्यानंतर त्याने हे व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर त्याचा मित्र सुरज चौधरी यानेही हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून पीडितेला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.


पीडितेने पतीला दिलेले आठ लाख रुपये राजेश चौधरी यास परत देऊन फोटो डिलीट करण्याची विनंती केली. मात्र, त्याने ते डिलीट केले नाहीत. तिने पुन्हा पाच लाख रुपेय देऊन फोटो डिलीट करण्याची विनंती केली.तेव्हा तो म्हणाला ‘ तुला माझ्याशी कायचे संबंध ठेवावे लागतील. तू जर तसे केले नाही तर मी तुझे फोटो व्हायरल करून तुला तुझ्या नवर्‍याला, तुझ्या मुलांना मारुन टाकीन.


दरम्यान आरोपींनी 20 फेब्रूवारी 2023 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान पीडितेवर अत्याचार केले. आरोपींच्या माणसिक, शारिरीक त्रासाला कंटाळून शेवटी पीडितेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात राजेश चौधरी व सुरज चौधरी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून उरुळी कांचन पोलीसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.



Comments


bottom of page