असली ‘गुन्हेगारी’ प्रवृत्ती ठेचली पाहिजे, परळी प्रकरणात मोक्का लावा - पालकमंत्री अजित पवार
- Navnath Yewale
- May 18
- 2 min read

जलालपूर (ता.परळी) साप्ताहाच्या पंगतीत झालेल्या किरकोळ वादातून परळीत एका तरुणाला एका टोळक्याने अपहरण करून रिंगण करूण अमाणुष मारहाण केली. ‘तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू’ म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉड, कत्तीने मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. ही असली गुन्हेगारी प्रवृत्ती ठेचून काढाली पाहिजे, आरोपींची पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर मोक्का लावा अशा सुचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.
लिंबोटी (ता. परळी) येथील शिवाराज दिवटे हा साप्ताहाच्या पंगतीमध्ये जेवत असताना तेथील काहींशी ग्रामस्थांचा वाद झाला. दरम्यान, या वादानंतर ग्रामस्थांनी त्या टोळक्याला गावातून हाकलून लावल, त्यावेळी शिवराज दिवटे तिथे हजर होता. पंगत झाल्यानंतर शिवराज दिवटे मित्रासोबत गावाकडे जाण्यास निघाला. परळीत आल्यानंतर त्याने शहरापासून काही अंतरावर असलेल्या रिलायंन्स पेट्रोल पंपासमोर या टोळक्याने शिवराज यास गाठले आणि मारहाण करत त्यास रत्नेश्वर डोंगरावर नेवून या टोळक्याने रिंगण करून लाठ्या काठ्यासह लोखंडी रॉड ने जबर मारहाण केली.
दरम्यान, जीव वाचवण्याच्या उद्देशाने अकांताने किंकाळत असलेल्या शिवराजचा आवाज ऐकून इतर दोघांनी घटनास्थळाकडे धाव घेवून आसूरी टोळक्याला तेथून पिटाळून लावले आणि शिवराज दिवटे याचा जीव वाचला. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस अधिकक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश दिले. त्यानुसार दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सायंकाळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मराठा सेवक गंगाधर काळकुटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शिवराज दिवटे यांची आंबाजोगाई येथील शासकिय रुग्णालयात भेट घेवून घटनाक्रम जाणून घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. पालकमंत्री अजित पवार यांचा सोमवारी जिल्हा दौर्या दिवशी (सोमवारी) घटनेच्या निषेधार्थ परळी बंदची हाक देण्यात आली आहे. पालकंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते.
मात्र, दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांच्या तंबीचाही बीडच्या गुन्हेगारीवर तसुभरही परिणाम झाला असे वाटत नाही. त्यामुळ—े रात्री पालकंत्री अजित पवार यांनी परळी मारहाण प्रकरणातील आरोपींची पार्श्वभूमी तपासून त्यांच्यावर मोक्का लावण्याच्या सुचना पोलिस प्रशासनाला दिल्या. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात दखल घेत थेट शिवराज दिवटे यांच्या भेटीसाठी अंबाजोगाईकडे रवाना झाले आहेत.
Comentários