अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहूभाषिक चित्रपट तयार करणार- मुख्यमंत्री फडणवीस
- Navnath Yewale
- May 31
- 2 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहूभाषीक चित्रपट तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीसोहळ्या निमित्त चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे आयोजीत कार्यक्रमास संबोधीत करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
“एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार असताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधानांना भेटलो आणि सांगितलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीसोहळ्या निमित्त जन्मस्थळी
कार्यक्रमासाठी निमंत्रीत करायंच आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दूसरीकडे कर्मस्थळ” यावेळेस कर्मस्थळी कार्यक्रमासाठी जाईल आणि पुढच्या वेळेतस जन्मस्थळी येईल. त्याच बरोबर महामाहिम राष्ट्रपती द्रोपती मुर्मू यांनाही निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या सचिवांशी माझं बोलण झालं. मात्र, महामाहिम राष्ट्रपतींना निमंत्रणाची प्रक्रिया वेगळी असते त्यामुळे पुढे निश्चित राष्ट्रपतीही अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी कार्यक्रमाला येतील.
छावा चित्रपटाचा संदर्भ:
कधी-कधी इतिहास फार क्रूर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामांन्यापर्यंत पोहोचण्याकरता दुर्दैवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चितपटानंर आजच्या पिढीला दैदिप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामांन्यापर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी अपयशी झालो होतो.
अहिल्यादेवीच्या जीवनावर चित्रपट तयार करणार
“ आमच्या लक्षात आलं की चित्रपट असं माध्यम आहे त्यामधून अतिहास सर्वापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या मंत्रीमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, अहिल्यामातांच्या जीवनावर बहूभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत. सर्व भाषांमध्ये तयार करणार आहोत. जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामतांचंं चरित्र, त्यांचं कर्तृत्व आणि देशावरचे उपचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत आह आपला प्रयत्न आहे. अहिल्यामातांकडून प्रेरणा घेऊन आपण काम करत आहोत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यावेळी ज्येष्ठ नेते आण्णा डांगे, आमदार मोनिका राजळे, सुरेश धस, गोपिचंद पडळकर आदींसह समाजबांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments