top of page

अहिल्यानगर हादरलं; विद्येच्या मंदीरात रक्त सांडलं !

आठवीच्या विद्यार्थ्याकडून दहाविच्या विद्यार्थ्याचा खून


विद्येचं मंदीर असलेल्या शाळेतील ज्ञाणार्जनाने विद्यार्थी उज्वल भवितव्य घडवतात. बालवयात किरकोळ भांडणं ठरलेलीच असतात मग ती शाळेत असो की गल्ली बोळात, पण शाळेतली भांडण, मारामार्‍या शिक्षक सोडवतात. मात्र अहिल्यानगरमधून धाक्कादाय घटना समोर अली आसून विद्येच्या मंदीरातच विद्यार्थ्याचा खून झाला आहे.


शहराच्या मध्यमर्ती भागात असलेल्या सिताराम सारडा विद्यालयात बुधवारी (25 जून) सकाळी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बागडपट्टी, तोफखाना परिसरातील या शाळेत दहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याचा आठवीत शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्यासोबत वाद झाला. काही क्षणांमध्येच हा वाद इतका विकोपाला गेला आणि एकाने दुसर्‍यावर शस्ताने हल्ला करून त्याचा जागीच खून केला.


दरम्यान, दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये क्रिकेट खेळण्यावरून भांडण झाले होते. मधल्या जेवनाच्या सुट्टीत भांडण वाढले आणि आठवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला चाकू मारला. यामध्ये दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकरी अमोल भारती यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील मयत आणि आरोपी दोघेही अल्पवयीन असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.


दरम्यान भरलेल्या शाळेमध्ये मुलाची हत्या झाल्यामुळे शाळेतील सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसंच या घटनेनंतर शाळा प्रशासन, शिक्षक आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शाळा परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून घटनेचा तास सुरू आहे. तसेच मुलाकडे शस्त्र कुठून आलं? याचाही शोध पोलिस घेत आहेत.

Comments


bottom of page