top of page

अ‍ॅड. उज्वल निकम यांची खासदारपदी निवड

ree

ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. मात्र, कॉग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आज राज्यसभेत राष्ट्र्रपती कोट्यातून त्यांची खरासदारपदी निवड झाली आहे.


1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासह अनेक महत्वाच्या केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले होते. गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या, 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला, कोपर्डी बलात्कार या हायप्रोफाईल केसमध्ये तयंनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून ते काम पाहत आहेत.


चार जणांची खासदारपदी निवड

उज्वल निकम यांच्यासोबत हर्षवर्धन श्रृंगला, डॉ. मीनाक्षी जैन, सी. सदानंदन मास्टर यांची दखील राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हर्षवर्धन श्रृंगला हे माजी परराष्ट्र सचिव आहेत. तर, सदानंद मास्टर हे केरळमधील ज्येष्ठ समाजसेवक शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर, मीनाझी जैन हा प्रसिद्ध इतिहासकार आहेत.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page