आंतरवालीतील तगड्या पोलिस बंदोबस्तावरुन जरांगे पाटील संतापले, फडणवीसांनी एवढा फौजफाटा कशासाठी लावला? मराठ्यांसोबत कुस्ती खेळायची की काय?
- Navnath Yewale
- Aug 28
- 2 min read

आंतरवाली: मराठा आरक्षण आंमलबजावणीसाठी विविध मागण्या घेवून उद्या शनिवारी (दि.29) पासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली (सराटी)येथे बेमुदत उपोषण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमिवर आंतरवाली गावात जाणार्या रस्त्यांसह गावात पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावरुन जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधला आहे. एकवढा मोठा पोलिस बंदोबस्त लावून मराठ्यांसोबत कुस्ती खेळायचीय का काय? असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
आंतरवाली सराटी येथे होणार्या आंदोलनावर आपण ठाम असल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मराठा समाजाकडून अर्ज येत नसल्याचा दावाही जरांगे पाटील यांनी खोडून काढला.
सरकार आणि अधिकार्यसांनी आमचे अर्ज स्वीकारले नाहीत आणि आता त्यालाच उदासीनता असल्याचे सांगितले जात आहे. ज्यांनी अर्ज केले आहेत, तसेच ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, मात्र प्रमाणपत्र मिळालेले नाही, अशा सर्वांनी अंतरवाली सराटी येथे येऊन अर्ज द्यावेत असे अवाहन त्यांनी केले.
निणार्यक आंदोलन असल्याने मराठा समाजाने घरात बसू नये, मरगळ झटकून एकत्र यावे, असे अवाहन करत जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली. निवड झाल्यानंतरही नियुक्ती न मिळालेल्या मराठा तरुणांनी देखील आंतरवालीत येऊन अर्ज द्यावेत असे अवाहन जरांगे पाटील यांनी केले.
जात प्रमाणपत्र प्रश्नावर अधिकार्यांनी अंतरवाली सराटीत येऊन प्रमाणपत्रे का दिली जात नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे. जिल्हाधिकारी,तहसीलदार, एसडीएम आणि जात पडताळणी समितीच्या अधिकार्यांना एकत्र बसतवून हा प्रश्न सोडवावा, जात प्रमाणपत्रासाठी मागणी करूनही त्याची आंमलबजावणी का होत नाही? याचे उत्तर सरकारने आंतरवालीत येऊन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
फडणवीस, शिंदेंनी तळतळाट घेऊ नये: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी काही निर्णय घेतले आहेत, हे आपण नाकारत नाही. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाचे नुकसानही तेच करत आहेत, असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला. फडणवीस आणि शिंदे यांनी मराठ्यांच्या लेकरांचा तळतळाट घेऊ नये. काहीही झालं तरी आपण आपल्या लेकरांसाठी लढणार, असे सांगतनाच मराइा समाजातील कोणत्याही व्यक्तीने आत्महत्या करू नये असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले.
तर मुंबईकडे कूच : अंतरवाली सराटी येथे आंदोलन होणार असल्याचे सांगत सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर मुंबईकडे कूच करण्यात येईल आणि लाखो गाड्या मुंबईत जातील, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सरकारने मोठ्या प्रमाणात पेालिस बंदोबस्त तैनात केल्यचा आरोप करत फडणवीसांना काय मराठ्यांसोबत कुस्ती खेळाची का? असा टोलाही त्यांनी लगावला.



Comments