आझाद मैदान आंदोलनाचं ठिकाण, आमरण उपोषण आंतरवालीतच! 29 ऑगस्ट नंतर मुंबईतील आझाद मैदानाचाही पर्याय - जरांगे पाटील
- Navnath Yewale
- Aug 19
- 2 min read

जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप करत कुणबी प्रमाणपत्रांच्या पातडताळी प्रमाणपत्र देण्यात यावेत, सर्व गॅझेट लागू करून त्याचा जीाआर काढण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांचं आंदोलन आतरवालीत होणार की मुंबईत यामध्ये संभ्रम कायम असतानाच आंदोलन आंतरवालीतच होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहिर केलं. पण सरकार जर आझाद मैदान हे आंदोलनाचं ठिाकण असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आंदोलनावर ठाम आहेत. होणार नाहीत असे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, नोंदीनुसार प्रमाणपत्र वाटप रोखून सरकार मरठ्यांविरोधात षडयंत्र रचत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठ्यांना धोका निर्माण झाला आहे. मुलाबाळांच भवितव्य धोक्यात आल्याचां अरोपही त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधतना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. मंत्री शिरसाठ ठरवून मराठ्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे मंत्री आहेत. एकनपाथ शिंदे त्यांना सांगून या प्रकरणाला आळा घालू शकतात.
एकनाथ शिंदेचं ऐकणार नाहीत असं होऊ शकत नाही, ते सांगत नाहीत याचा अर्थ दोघांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.एकनाथ शिंदे यांना शिरसाठ हवा आहे. त्यामुळे मराठ्यांचा रोष ते ओढावून घेत आहेत. 29 ऑगस्ट नंतर मराठ्यांची एकी पाहायला मिळणार आहे त्यांना. तुम्ही आमच्या मुलाबाळां भविष्यावर घाव घातला म्हणजे आमच्या मुळावर घाव घातला आता आम्ही ही तुमच्या मुळावर घाव घालणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला.
मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगी बाबत बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही आंतरवालीत 10 ते 20 दिवस उपोषण करणार आहोत, पण त्यावरही सरकार ठिकाण्यावर नाही आलं तर आम्हाला मुंबईला जावचं लागणार आहे. त्यासाठी केवळ निवेदन देण्यासाठी सांगितलं होतं. त्यावर 29 ऑगस्टची तारीख टाण्यात आल्याची माहिती मला आत्ता मिळाली.
ओबीसी नेत्यांनीही आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मागितल्या प्रकरणी जरांगे पाटील म्हणाले आम्ही केवळ पर्याय म्हणून निवेदन दिलं आहे, परवानगी मिळो अथवा न मिळो. ओबीसीचे स्वयंघोषीत काही नेत्यांनी आम्ही आगोदर अर्ज केला आहे. प्राधान्य आम्हाला द्यावे अशा वल्गना केल्या, आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांनी परवानगी घ्यावी असंही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, 29 ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे, पांडूरंग तारख यांनी नुकताच आझाद मैदान येथे आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज केल्याने जरांगे पाटील ‘ गनिमी कावा ’ करणार असल्याचे स्पष्ट झाले होते. गंगाधर काळकुटे यांनी जरांगे पाटील आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे जाहिर करत आझाद मैदान हे आंदोलनाचं ठिकाण आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो आंदेालन आझाद मैदान येथेच होणार असल्याचं जाहीर केलं. मात्र आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत आंतरवालीत अमरण उपोषण होणार असून त्यानंतर गरज पडली तर मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले.



Comments