आता नवीन कार, बाईक खरेदी करणे होणार कठीण !
- Navnath Yewale
- May 21
- 2 min read

महाराष्ट्रातील वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी आणि चांगली पार्किंग वाढवण्यासाठी महाराष्ट्रात लवकरच एक नवीन नियम लागू होणार आहे. महाराष्ट्रात नवीन कार किंवा बाईक खरेदी करणे सोपे राहणार नाही. कारण नवीन वाहनाची नोंदणी फक्त “ प्रामाणित पार्किंग प्लेस ” असेल तरच केली जाणार आहे.
याचा अर्थ, जर तुमच्याकडे तुमची बाईक किंवा कार पार्क करण्यासाठी पार्किंगची जागा नसेल, तर तुम्ही वाहन खरेदी करू शकणार नाही. महाराष्ट्र परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रातील वाहनांची वाएती संख्या रोखण्यासाठी हे क्रांतिकारी धोरण राबविण्याचा विचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये वाहतूक आणि पार्किंगच्या समस्या वाढत आहेत आणि अशा समस्यांना तोंड देण्यासाठी हे धोरण राबवणे आवश्यक होत आहे. काही काळापूर्वी परिवहन विभागाने या धोरणा संबंधित 100 दविसांचा प्रकल्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शेअर केला आहे.
हे कडक नियम इतर देशांमध्ये आहेत, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले की, “ परिवहन विभागाने सिंगापूर, लंडन, चीन, जर्मनी येथे वाहनांची संख्या नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजनांचा अभ्यास केला आहे. उदाहरनार्थ लंडनमध्ये, गर्दीच्या वेळी शहराच्या मध्यवर्ती भागात जास्त पार्किंग शुल्क आकारल जाते. त्याचप्रमाणे, सिंगापूरच्या गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या वेळी, जास्त शुल्क आकारले जाते”.
राज्यात जपानचा राजवट लागू होणार:
भीमनवार म्हणाले की, भारतातील विशिष्ट परिस्थितीमुळे कोणतेही एक परराष्ट्र धोरण थेट लागू करता येत नाही, परंतु येथे जपान मॉडेल लागू केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, जपानमध्ये वाहन खरेदी करण्यापूर्वी पार्किंग प्रमाणपत्र आवश्यक आहे. महाराष्ट्रातही असाच नियम लागू केला जाईल. ज्यामध्ये वाहन खरेदी करताना पार्किंग प्रमाणपत्र दाखवावे लागेल.
हा नियम कसा लागू केला जाणार?
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले की, या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर नवीन वाहनांची नोंदणी फक्त नियुक्त पार्किंग जागा असेल तरच केली जाईल. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पार्किंगची ठिकाणे ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल आणि या ठिकाणांना विशेष ओळख दिली जाईल. जे नंतर वाहनांच्या नोंदणी क्रमांकांद्वारे डिजीटली लिंक केले जाईल. भीमनवार यांनी स्पष्ट केले की, जर एखाद्या शहरात 100 पार्किंगची ठिाकणे असतील. परंतु तेथे 110 वाहने असतील, तर अतिरिक्त 10 वाहने सार्वजनिक ठिकाणी पार्क करावी लागतील.
Comments