आता भारतातच बनणार आयफोन
- Navnath Yewale
- Apr 25
- 2 min read

अमेरिकन टेक कंपणी आणि सर्वात लोकप्रिय मोबाईल आयफोन बनवणारी कंपणी अॅपल त्यांच्या उत्पादनात मोठा बदल करण्याची योजना आखत आहे. पुढील वर्षीपर्यंत, कंपनीचे अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. अमेरिका आणि चीनमणधील सुरू असलेल्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे . ज्यामुळे चीनी आयातीवर शुल्क आकारले गेले आहे .
चीनमध्ये उत्पदन सुरू राहिले तर आयफोन होणार महाग
महितीनुसार, अॅपल अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी भारतात आयफोनचे मोठे उत्पादन युनिट बनवण्याचा विचार करत आहे.हा निर्णय राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर कर लादल्यामुळे प्रभावित झाला आहे. ज्यामुळे उत्पादन चीनमध्येच राहिले तर अमेरिकेत आयफोनच्या किमती वाढू शकतात.
भारतात उत्पादन क्षमात वाढविण्याच्या अॅपलच्या येाजना अमेरिका-चीन व्यापार चर्चेवर अवलंबून आहेत.
कंपनीने 2025 पर्यंत 4 कोटी फोनचे उत्पादन वाढविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भारतातील कंत्राटी उत्पादक आधीच त्यांच्या सुविधांची क्षमता वाढवत आहेत. फॉक्सकॉनचा बेंगळुरूमधील प्लांट या महिन्यात कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. ज्याची कमाल उत्पदान क्षमता दोन कोटी फोनची आहे. जर ते यशस्वी झाले तर 2026 पर्यंत अॅपलचे भारतीय उत्पादन दुप्पट होऊ शकते, जे दरवर्षी 6 कोटींहून अधिक आयफोनपर्यंत पोहोचू शकते.
जागतिक बाजारपेठेवर परिणाम
अमेरिका हा अॅपलचा सर्वात मोठा बाजार राहिला आहे. 2024 मध्ये त्याच्या जागतिक विक्रीत सुमारे 28 % वाटा आहे. भारतात आयफोनचे उत्पादन केल्याने टॅरिफमुळे होणार संभाव्य खर्च कमी होण्यास मदत होऊ शकते आणि अमेरिकन बाजापेठेत अॅपलचे स्थान मजबूत होऊ शकते. कारण किमती चीनमधील उत्पादनापेक्षा कमी असू शकतात.
अॅपलची किंमत आणि नाव दोन्ही सुरक्षीत
राजकिय अव्हानांमध्येही उत्पादन युनिट मजबूत करण्यासाठी अॅपलच्या प्रयत्नांचे हे धोरणात्मक पाऊल प्रतिबिंबित करते. भारतातील वाढत्या उत्पादन क्षमतेचा फायदा घेऊन, अॅपल इतर स्पर्धकांशी स्पर्धा करण्याचे ध्येय ठेेवेल. अशा परिस्थितीत, अॅपलला आयफोनची किंमत कायम ठेवणे आणि अमेरिकेत आपली बाजापेठ सुरक्षित करणे सोपे होईल.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पकड मजबूत
या बदलाचा परिणाम म्हणजे कौशल्याच्या आधारे भारताची उत्पादन क्षमता वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात आपली पकड मजबूत करणे. या बदलांना सामोरे जाताना, अॅपलचे लक्ष खर्च कमी करताना चांगल्या दर्जाचे उत्पादन देण्यावर असेल.
Comments