top of page

आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री फडणवीस एकाच हॉटेलमध्ये; ठाकरे कुटुंबीयांची जवळीक वाढली?

ree

राज्याच्या राजकाणातून महत्वाची बातमी समोर आली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे मुंबईतील एकाच हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आता या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकारणात नवे समिकरण तर उदयास येणार नाही ना? अशा चर्चांना वाव मिळत आहे.


प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये एकत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे कुटुंब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत. त्यामुळे आता हे दोन्ही नेते एकत्र असल्याने नव्या चर्चांना उधान आले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होेते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या दोघांमध्ये भेट झाली नसल्याचीही माहिती आहे.


फडणवीसांनी दिली ऑफर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली होती. उद्धवजी 2029 पर्यंत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचवा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली होती.


उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात.


दोन्ही नेत्यांची भेट

विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली होती. या भेटीवर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ‘हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखाचा संग्रह प्राप्त झाला, ठाकरेंरी काल दिलेलं पुस्तक मी वाचलं. कुणी कुणाला भेटलं म्हणजे युतीसाठी भेटलं असं होत नाही असं स्पष्टीकरण दिले होते.

Recent Posts

See All
स्वबळाचा नारा काँग्रेसचा ! फायदा मात्र भाजपाचा !!

मुंबई महापालिका निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार! असा नारा भाई जगताप यांनी दिला आणि मुंबईचे राजकारण पुन्हा एकदा तापू लागले. मतदार यादीत घोळ झाला असा आरोप करीत भाजपा विरोधकांनी एकजुटीने आक्रमक भूमिका

 
 
 

Comments


bottom of page