आबू आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मराठी मुद्दा होता है क्या, फालतू बाते...
- Navnath Yewale
- Jun 22
- 1 min read

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयावर वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात मराठी भाषेला सन्मान मिळावा त्यामुळे सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध होत आहे. मराठी भाषेचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. तर मनसे देखील भाषेच्या सन्मानार्थ मैदानात उतरली आहे. राजकीय नेत्यांना प्रतिक्रियाही समोर येत आहेत. यातच सपा नेते अबू आझमी यांनी मराठीबद्दल अजब विधान केलं आहे, ‘कराठी क्या मुद्दा है क्या, फालतू बाते करते है’ असे म्हणत सर्वच मराठीवर प्रेम करातात, असेही ते म्हणाले.
अबू आझमी म्हणाले की, महाराष्ट्रात जे राहतात ते सर्व मराठीवर प्रेम करतात, कोणाचीच मराठी सोबत नफरत नाही. ‘मराठी क्या मुद्दा होता है क्या, फालतू बाते करते ह’ आझमींनी पुढे नमुद केले की, “ भाषा अशी असली पाहिजे की कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तिचाव सन्मान झाला पाहिजे. तर एका त्या त्या राज्यातील भाषेचाही सन्मान झाला पाहिजे. संसदेत एक कमिटी आहे, भाषेच्या नावावर 45 मेंबर आहेत. ते भारतभर जाऊन हिंदीतून काम करण्यासाठी प्रोत्साहित करतात. केंद्र सरकारचं कामही हिंदीतूनच चालतं’ आता महाराष्ट्राचं पाहिलं तर तीन भाषा असतील तर सगळ्यात पहिल्यांदा मराठी असली पाहिजे. दुसरी भाषा हिंदी आणि त्यानंतर इंग्रजी भाषा असायला हवी. ‘ महाराष्ट्रात जर तिसरी भाषा हिंदी नसेल तर तुम्हीच सांगा कोणती भाषा पाहिजे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावरही आझमींनी भाष्य केले आहे. ‘ ठाकरे बंधु एकाच घरात जन्माला आले असतील तर सोबत राहतील, त्यात आम्हालाही आनंद आहे. ‘ असे आझमी म्हणाले. तर ‘ राज ठाकरेंची सध्या काही ताकद नाही, ते फक्त द्वेषाचं राजकारण करतात. उत्तर भारतीयांविरोधात आणि हिंदी विरोधात बोेलणं हा त्यांचा नेहमीचा धंदा झाला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
Comments