top of page

आमचे दोन टक्के काढा म्हणता, टक्क्यात सुद्धा ठेणार नाही- धनंजय मुंडे

ree

अहिल्यानगर: वंजारी समाजाला ‘एसटी’मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी- शेवगावमधील वंजरी बांधव काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी भेट देत चर्चा केली. तत्पूर्वी भाजप अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी आंदोलनकर्त्यांचे भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी 15 दिवसांत बैठक लावून तोडगा काढण्याचं अश्वासन दिलं होतं.


दरम्यान, मंत्री विखे पाटील यांच्या आश्वासनानंतर देखील युवकांचं आंदोलन सुरू होतं. उपाषण स्थळावरील अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी थेट माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. युवकांच्या आंदोलनाची माहिती दिली. तसंच पालकमंत्री विखे पाटील यांनी दिलेल्या आश्वसानाची कल्पना दिली. यानंतर आंदोलकांना तुम्ही समजवा, असे सांगून मोबाईल माईकसमोर धरला. यावेळी आमदार मुंडे यांनी आंदोलकांशी मोबाईलवरून संपर्क साधला.

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे म्हणाले की, “ हैदराबाद गॅझेट निघाले नसते, तर आपण म्हणजेच वंजारी समाज, पाथर्डीमध्येच नाही, बर्‍याच ठिकाणी, इतर राज्यांमध्ये आपण एसटीमध्ये आहोत हेच कळलं नसतं. आम्हाला अगोदरच माहित होतं की आपण एसटीमध्ये आहोत. कारण तेलंगणाच्या बौर्डरच्या जवळ परळी येते. लोकनेते गोपीनाथ मुंडे असल्यापासून सर्वांना माहिती आहे की, अनेक पाहुणे तिकडे एसटीमध्ये आहेत. आणि आपण इकडं व्हीजे-एनटीमध्ये आहोत.”


‘आता हैदराबाद गॅझेटनुसार चर्चा निघाली आहे. हैदरबाद गॅझेटनुसार इतर कुणाला फायदा मिळत असेल, तर त्या हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. गॅझेटमधील एका-एका शब्दाचा फायदा इतर कुणाला होत असेल, तर तो देखील आम्हाला झाला पाहिजे. कारण, आपलं दोन टक्क्यांमध्ये बरं चाललं होतं; असं धनंजय मुंडे म्हणाले.

आमदार मुंडेचा जरांगेंना इशारा

धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता हल्ला चढवला. आता हे दोन टक्के सुद्धा काढा, असे काही जण बोलायला लागले आहेत. जे बोलायला लागले आहेत ना, दोन टक्के सुद्धा वंजार्‍याचं आरक्षण काढा म्हणून, अरे भावांनो, तुम्हाला टक्क्यांमध्ये सुद्धा ठेवणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला.

हे सरकार आपल्यासोबत आहे, सरकार आपलं नुकसान करणार नाही, सरकारवर विश्वास ठेवा, असे आवाहन केले. तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी पाथर्डीत येऊन सांगितलं आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन देऊ. त्यांचा आणि सरकारचा मान ठेवून आपलं उपोषण स्थगित करांव, अशीही विनंती आंदोलनाकर्त्यांना धनंजय मुंडे यांनी केली.


Comments


bottom of page