आत्मघातकी हल्ल्याने पाकिस्तान हादरले; बॉम्ब स्फोटात 13 सैनिक ठार
- Navnath Yewale
- Jun 28
- 1 min read

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांंत वाढ होत आहे. दहशतवाद पोसणार्या पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागातील उत्तरी वजीरिस्तानमध्ये (28 जून) आत्मघातकी हल्ला झाला आहे. या बॉम्बस्फोटात 13 पाकिस्तानी सैनिक ठार झाले तर 20 हून अधिक जखमी झाले आहेत. मीर अली खादी मार्केटमध्ये झालेल्या या हल्ल्यात जखमींमध्ये 12 हून अधिक महिला आणि लहान मुलांना समावेश आहे. ज्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचे बोलले जाते.
प्राप्त माहितीनुसार, एका कारने सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला जोरदार टक्कर मारली. ते बॉम्ब डिस्पोजल युनिटचे वाहन होते. सैन्याचे वाहन नागरी भागात ड्यूटीवर जात होते. त्यावेळी हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची पाकिस्तानातील दहशवातदी संघटना तहरीक ए तालिबान पाकिस्तान चा गट उसूल उल हर्ब याने जबाबदारी घेतली आहे.
आत्मघातकी हल्ल्यात स्फोटांनी भरलेली कार सैन्याच्या ताफ्याला धडकी त्यातून झालेल्या स्फोटात 13 सैनिक ठार झाले. 10 जवान जखमी आहेत याशिवाय 19 सर्व सामान्य नागरिकही जखमी झाले. या स्फोटाने आसपासच्या रहिवासी घरांनाही मोठे नुकसान झाल्याचे एका अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
हा स्फोट एवढा भयानक होता की, त्याच्या आवाजाने 2 घरांवरील छत खाली कोसळले आणि त्यात 6 मुले जखमी झाले आहेत. हा आत्मघातकी हल्ला अशावेळी झाला जेव्हा पाकिस्तानात विशेषत: खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान प्रांतात दहशवादी कारवाया वाढल्या आहेत.
यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानी सैन्याने टीटीपी दहशवादी संघटनेशी निगडीत 10 संशयित दहशतवाद्यांना मारले होते. मार्चमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या बंडखोरांनी गुडालार आणि पीरू कुनरी येथील जाफर एक्सप्रेस ट्रेनवर हल्ला केला होता. ज्यात 21 प्रवासी आणि 4 अर्धसैनिक दलाचे जवान मारले गेले होते.
दरम्यान, जागतिक दहशतवादी आकडेवारी 2025 नुसार, पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 45 टक्यांनी वाढली आहे. 2023 साली 748 जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला होता. 2024 साली मृतांचा आकडा 1081 पर्यंत वाढला. त्याशिवाय पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या जगातील दुसर्या क्रमांकाची आहे.
Comments