आम्ही 1500 रुपये दिले की महिला शॉपिंगवर खर्च करतात.., अदिती तटकरेंनी उडवली लाडक्या बहिणींची खिल्ली!
- Navnath Yewale
- Jul 26
- 1 min read

अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जात आहे. निकषांच्या चाळणीतून कित्तेक महिलां या योजनेतून वगळण्यात येत असल्याने राज्यातील महिलां वर्गात संताप असतानाच मंत्री आदिती तटकरेंनी वादग्रस्त विधान केलं आहे. आदिती तटकेरंच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जामा करण्यात येतात. विधानसभा निवडणुकांपूर्वी सरसकट महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र त्यानंतर हळूहळू निकषांची चाळणी लावून राज्यातील लाखो महिलां योजनेस अपात्र ठरल्या. या योजनेमुळेच महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा झाल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकी नंतर सरकारने योजनेच्या लाभासाठी केवायसी सक्तीची केली, त्यानंतर लाखो महिलां योजनेस अपात्र ठरवून त्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली. त्यामुळे विरोधकांकडून या मुद्यावरून आता सरकारच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीसाठीच ही योजना सुरू केली होती का? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
योजनेवर विरोधकांकडून प्रश्नांचा भडिमार होत असतानाच आता मंत्री आदिती तटकरे यांनी लाभार्थी महिलांची खिल्ली उडवणारे विधान केले आहे. त्या वाशिम येथे बोलत होत्या, आदिती तटकरे म्हणाल्या की, आम्ही दिलेले 1500 रुपये महिला या शॉपिंगवर खर्च करतात, पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा झाल्यानंतर मार्केटमध्ये गर्दी वाढते, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी जमा करणार आहात असं विधान त्यांनी केलं. त्या वाशिम येथे आहिल्या भवनाच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त अयोजित संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. आदिती तटकरे यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
ईकेवायसी पुन्हा सुरू : या योजनेसाठी सरकारने ईकेवायसीसाठी दिलेली मुदत संपली होती, अनेक महिलांना ईकेवायसी करता आली नव्हती, अशा महिलांसाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे, पुन्हा एकदा ईकेवायसीला सुरुवात झाली आहे. पुढील सहा महिने ईकेवायसी करता येणार आहे.



Comments