top of page

आयपीएल सामन्यात रियान परागचा कहर; 6 चेंडूत 6 षटकार



पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीला बाद करुन वैभवने अरोराने राजस्थानला पहिला धक्का दिला दोन चेंडूत चार धावा काढून वैभव बाद झाला. मोईन अलीने कुणालला बाद करुन राजस्थानला दुसरा धक्का दिला. कुणाल खाते न उघडताच बाद झाला. यशस्वी जयस्वालला बाद करून मोइन आलीने राजस्थानच्या विजयाचा आशांना मोठा धक्का दिला.


सुरवातीच्या अपयशानंतर, रियान परागने एका टोकापासून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मोईन अलीच्या एकाच षटकात रियान पराग पाच षटकार माण्यात यशस्वी झाला. 13 व्या षटकात माईन अलीच्या 5 चेंडूत रियान परागने 5 षटकार मारले. यानंतर पुढच्याच षटकात, रियान परागने वरुण चक्रवर्तीच्या चेंडूवर एक मोठा षटकार मारला. तो आयपीएलच्या इतिहासात सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे. रियान परागला पाहून डगआउटमध्ये बसलेला आंद्रे रसेललाही घाम फुटू लागला.


राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुुणाल सिंग राठौर, धु्रवा जुरेल (यष्टिरक्षक), शिमरोन हेटमायर, वनिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षीना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल.


प्रभावशाली खेळाडू: कुमार कर्तिकेय, शुभम दुबे, तुषार देशपांडे, क्वेन माफाका, अशोक शर्मा


कोलकता नाईट रायडर्स: रहमानउल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा


प्रभावशाली खेळाडू : मनीष पांडे, हर्षित राणा, अनुकुल रॉय, रोवमन पॉवेल, लवनीथ सिसोदिया

Comments


bottom of page