आयपीएल 2025 रोहित शर्माच्या नावावर एक ऐतिहासीक विक्रम
- Navnath Yewale
- Apr 12
- 2 min read
हा विक्रम कोहली, धोनी मोडू शकणार नाहीत

ऋतुराज गायकवाड बाहेर पडल्याने महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. महेंद्रसिंग धोनी हा आयपीएलच सलग 18 वा हंगाम खेहणार्या निवडक खेळाडूंमध्ये समाविष्ट आहे. पहिल्या हंगामातील चार खेळाडू या हंगामात खेळत आहेत. पहिल्या हंगामापासून (आयपीएल 2025) आयपीएलमध्ये असलेल्या चार खेळाडूंमध्ये राहित शर्माचे नाव देखील समाविष्ट आहे. रोहित शर्माने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे, जो धोनी आणि कोहलीसारखे खेळाडू आयपीएलमध्ये कधीही साध्य करू शकणार नाहीत. ही खास कामगिरी करणारा राहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे.
खरं तर,2008 च्या (आयपीएल 2025) आपीएलपासून चार खेळाडू अजूनही सक्रिय आहेत. यामध्ये रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि मनीष पांडे यांची नावे आहेत. रोहित शर्मा आयपीएलपूर्वी 2007 चा टी-20 चा विश्वचषक खेळला होता. त्याच्या शिवाय, त्या विश्वचषकात धोनी कर्णधार होता. तापेर्यंत विराट कोहलीचा कोणाताही पत्ता नव्हता आणि तो टीम इंडियाच्या बाहेर होता. त्याच्याशिवाय मनीष पांडेनेही पदार्पण केले नाही. दोन्ही खेळाडू नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी आले. अशाप्रकारे 2008 मध्ये, कोहली आणि पांडे दोघेही अनकॅप्ड खेळाडू होते. त्या हंगामानंतर, कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला.
रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने कॅप्ड खेळाडू म्हणून सुरुवातीपासून सलग 18 आयपीएल हंगाम खेळले आहेत. पहिल्या हंगामात कोहली आणि मनीष पांडे अनकॅप्ड होते आणि यावेळभ महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून अनकॅप्ड श्रेणीत खेळत आहे. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. कोहली, धोनी आणि रोहित या तिघांनीही (आयपीएल 2025) आपीएलमध्ये आपापल्या संघाचे नेतृत्व केले पण कोहलीला यश मिळाले नाही. दूसरीकडे रोहित शर्मा आणि धोनी दोघांनीही प्रत्येकी पाच जेतेपदे जिंकली आहेत. धोनीने चेन्नईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले तर रोहितने मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले.
राहेति शर्मा-आयपीएल 2008 -2025 (कैंप्ड प्लेयर)
विराट कोहली -आयपीएल 2008 (अनकैंप्ड प्लेयर)
महेंद्रसिंग धोनी - आयपीएल 2025 (अनकैंप्ड प्लेयर)
मनीष पांडे- आयपीएल 2008 ( अनकैंप्ड प्लेयर)
Comments