top of page

आयपीएल 2025; 17 वर्षे जुना ‘विक्रम’ मोडला आयुष म्हात्रेने पदार्पणाच्या सामन्यातच रचला ‘इतिहास’


17 वर्षीय युवा फलंदाज आयुष म्हात्रेने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण केले. या धमाकेदार सामन्यात त्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नई इलेव्हनमध्ये घेतली आणि (आयपीएल 2025)पहिल्याच सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली.


आयुष म्हात्रेचे धमाकेदार पदार्पण

(आयपीएल 2025) हंगामाच्या आयपीएलसाठी , कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेचा संघात समावेश करण्यात आला. तो संघात सामिल होताच, एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने त्याला ताबडतोब प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. 17 वर्षीय हा खेळाडू त्याच्या घरच्या मैदानावर पदार्पण करत आहे, कारण तो मुंबईचा आहे आणि आयुष म्हात्रे स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांच्याकडून खेळतो.


आयुष म्हात्रे यांचे खूप कौतुक

आयुष म्हात्रेने आयपीएल पदार्पणातच दिपक चहरने बाद होण्यापूर्वी फक्त 15 चेंडूत 32 करत चांगली छाप पाडली. सीएसकेच्या या फलंदाजाने त्याच्या डावात चार चौकार आणि दोन षटकार मारले. हे पाहून संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी खूप आनंदी दिसत होता. याशिवाय सोशल मिडियावरील चाहतेही त्याच्या खेळीचे कौतुक करत आहेत.


आयुष म्हात्रेने रचला इतिहास

आयुष म्हात्रे हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. (आयपीएल 2025) अवघ्या 17 वर्षे आणि 278 दिवसांच्या वयात पदार्पण करून, तो असे करणारा चेन्नईचा पहिला खेळाडू बनला आहे. यासह त्यांनी इतिहासाच्या पानांवर आपले नाव नोंदवले 2008 मध्ये पहिल्या हंगामात अभिनव मुकुंदने केलेला विक्रम मोडून त्याने ही मोठी कामगिरी केली आहे.

Comments


bottom of page