आरबीआयच्या निर्णयानंतर चार सरकारी बँकानी व्याजदर कमी केले
- Navnath Yewale
- Apr 11
- 1 min read

भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या एमपीसी बैंठकीत सलग दुसर्यांदा व्याजदारात कपात केली आहे. त्याचा थेट परिणाम अल्पावधीतच दिसून आला. चार सरकारी बँकांनी त्यांचे व्याजदर कमी केले आहेत. या बँकांमध्ये पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि युको बँक यांचा समावेश आहे. बँकांच्या या निर्णयाचा फायदा त्यांच्या विद्यमान आणि नवीन कर्जदारांना होणार आहे.
पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) आरबीएलआर 9.10 टक्यांवरुन 8.85 टक्के केला आहे. नवे व्याजदर 10 एप्रीलपासून लागू झाले आहेत.
चेन्नईस्थित इंडियन बँकेने सांगितले की, 11 एप्रीलपासून त्यांचा रेपो-लिंक्ड बेंचमार्क लेंडिंग रेट 65 बेसिस पॉइंड्सने कमी करुन 8.70 टक्के केला जाईल
़ बँक ऑफ इंडियाचा नवीन आरबीएलआर 8.85 टक्के आहे, जो पूर्वी 9.10 टक्के होता. बँक ऑफ इंडियाने सांगितले की, नवीन दर 9 एप्रीलपासून लागू झाले आहेत.
युको बँकेने सांगितले की त्यांनी कर्जाचे दर 10 एप्रीलपासून 8.8 टक्यांपर्यंत कमी केले आहेत.
बुधवारी आरबीआयने सलग दुसर्यांदा व्याजदरात 25 बेसिस पॉइंडची कपात केली. रेपो दरातील कपातीचा थेट परिणाम होम लोण, कार लोन आणि पर्सनल लोनसह सर्व प्रकारच्या व्याजदरांवर होतो. या निर्णयामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळणार आहे. मध्यवर्ती बँकेने चलनविषयक धोरणाची भूमिका‘न्यूट्रल अकोमोडेटिव’अशी बदलली आहे. अकोमोडेटिवचा अर्थ असा की मध्यवर्ती बँक भविष्यात चलनविषयक धोरणात नरम भुमिका कायम ठेवू शकते.
댓글