top of page

आरबीआय सोने खरेदी का करतेय





भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीय) 2024-25 या आर्थीक़ वर्षात आतापर्यंत एकूण 57.5 टन सोने खरेदी केले आहे, ज्यामुळे देशाचा एकूण सोन्याचा साठा 879.6 टन झाला आहे. ही खरेदी गेल्या सात वर्षातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी वार्षिक खरेदी मानल जाते.

सोन्याकडे नेहमीच एक सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहिले जाते, म्हणजेच अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारी गोष्ट. सामान्य लोकांसोबतच आता रिझर्व्ह बँकही आपल्या सोन्याच्या साठ्यात वाढ करत आहे. यामगील आरबीआयची रणनीती अशी आहे की ती आपल्या परकिय चलन साठ्यात विविधता आणत आहे.


जागतिक आर्थिक निश्चितता आणि डॉलरची स्थिती लक्षात घेऊन आरबीआयने ही खरेदी केली आहे. अमेरिकेन डॉलरच्या अस्थिरतेमुळे आणि पाश्चात्य अर्थव्यवस्थांकडून येणार्‍या दबावामुळे जगभरातील अने मध्यवर्ती बँक त्यांच्या साठ्यातील सोन्याचा वाटा वाढवत आहेत. भारतही आपला साठा मजबूत आणि संतुलित करण्यासाठी या दिशेने वाटचाल करत आहे.

एका राष्ट्रीय वृत्तपत्राच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आपार्यंतची सर्वाधिक सोने खरेदी 2021-22 या आर्थिक वर्षात केली होती, त्यावेळी एकूण 66 टन सोने खरेदी केले होते. यानंतर 2022-23 मध्ये 35 टन आणि 2023-24 मध्ये 27 टन सोने खरेदी करण्यात आले होते.


Comments


bottom of page