आर्थीक सर्जीकल स्ट्राईकने भारताने बांग्लादेशाच्या नांग्या ठेचल्या
- Navnath Yewale
- Apr 11
- 2 min read

जिहादी, फतवेबाजांच्या हाता बांगलदेशाची सत्ता गेल्यापासून हा देश अराजकतेच्या उंबरठ्यावर आहे. धर्मवेड्यांनी या देशाची अवस्था बकाल करण्यास सुरू केली आहे. त्यातच भारताला डिवचण्याचा प्रयत्न या देशाच्या चांगलाच अंगलट आला आहे.
बांगला देशाला भारताने स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. या देशाची आर्थीक घडी नीट ठेवण्यासाठी सतत भरीव आर्थिक मतद दिली. पण हा देश कट्टरपंथीयांच्या हाती गेला. आता धर्मवेड्यांना जगात कटोरा घेऊन भीक मागण्याची वेळ येणार आहे.
चीनमध्ये दिसला युनूस यांचा खरा रंग
अमेरिकेत सत्तापालट झाले. राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प आले. त्यांनी बांग्लादेश प्रकरणात निर्णयाचे अधिकार भारताकडे असल्याचे सूतोवाच केले. तर आर्थिक संकटांचा सामना करणारा बांग्लादेश चीनकडे मदत मागण्यासाठी गेला. सध्याचे काळजीवाहू प्रशासक मोहम्मद युनूस यांनी बीजींग येथे भारताविरोधात गरळ ओकली. भारताचे सर्व उपकार युनूस विसले. भारताविरोधात आगळीक केली. त्यामुळे भारताने बांगलादेशावर आर्थिक सर्जिकल स्ट्राईक केली.
असा घेतला निर्णय
बांग्लादेश आता व्यापारासाठी भारतीय भूमीचा वापर करू शकणार नाही. भारताने 2020 मध्ये बांगलादेशाला ट्रांसशिपमेंटची सुविधा दिली होती. त्या आधारे बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, आणि भूतान या देशात भारतीय भूभागाचा वापर करुन त्यांच्या सामानाची निर्यात करू शकत होता. आता भारताने बांग्लादेशाची ट्रांसशिपमेंटची सुविधा बंद करण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मेहम्मद युनूस यांनी चीनमध्ये गेल्यावर भारतविरोधात वक्तव्य केले होते. भारताच्या पूर्वोत्तर राज्यांचा उल्लेख करत चीनने आता या भागात आर्थिक विस्तार करण्याचे अवाहन युनूस केले होते. भारताचा पूर्वोत्तर भाग हा चिकन नेक असल्याचे सूतोवाच करत चीनला याठिकाणी सुविधा मिळाव्यात म्हणून बांग्लादेशाने सीमावर्ती भागात एक विमानतळ विकसीत करण्यासाठी चीनला आमंत्रण दिले आहे. या सर्व घडामोडींचा परिनाम दिसून आला.
थायलंडमध्ये भारताचे प्रधामंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यात 38 मिनिटे बैंठक झाली. या बैंठकीत भारताने हिंदूवरील वाढत्या हल्ल्यावर चिंता व्यक्त केली. त्याबाबत युनूस चकार शब्द बोलले नाही. त्यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावर जोर दिला. पाकिस्तान आणि चीनमधून बांगलादेशातील कट्टरतावाद्यांना आर्थिक बळ मिळत असल्याचे समोर आले आहे. भारताच्या या निर्णयामुळे बांगलादेशातील कापड उद्योगाला मोठा फटका बसणार आहे.
Comments