आळंदीच्या पुरग्रस्थ पुनर्बांधणीसाठी दहा कोटींचा विशेष निधी मंजूर
- Navnath Yewale
- Jul 7
- 2 min read
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा; वारकर्यांना देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्याला येण्याचे आवाहन

मुंबई : राज्यात काही भागात पावसात कहर पाहायला मिळत आहे. विशेष: मुंबई-पुण्यासह कोकणात पावसाची संततधार सुरू असून नदी-नाले आणि बहुतांश भाग जलमय झाल आहे. अशातच राज्यातील वारकर्यांसाठी श्रद्धास्थाना असलल्या संत ज्ञाणश्वर महाराजांच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आला आहे. दीवरील चारही पूल पाण्याखाली गले आहे. त्यामुळं अपेक भागात पुराचं पाणी शिरलं होतं. त्यामुळं मोठं नुसकान झालं आहे. अशातच राज्याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घतला आहे. आळंदीच्या पूरग्रस्त पुनर्बांधणीसाठी 10 कोटी रुपयांची विशेष मदत जाही केली आहे.
आषाढी वारीदरम्यान पुरामुळे झालेल्या नुकसानीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र आळंदीसाठी 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीतून पाणीपुरवठा, जलशुद्धीकरण केंद्र, रस्ते, पुल, पथदिवे, सार्वजनिक शौचालये आणि अन्य नागरी सुविधांची तातडीने दुरुस्ती व पुनर्बांधणी केली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून, वारकरी आणि नागरिकांना आवश्यक सुविधा तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्ञाणोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणार्या वारकर्यांसाठी मंदिर प्रशासनाकडून सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे. सध्याची पूर परिस्थिती निवळेपर्यंत श्री संत ज्ञाणेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्हा आणि विशेषत: मावळ,देहू व आळंदी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. नदीची दोन्ही पात्रे दुथडी भरुन वाहत असून आळंदी व देहू परिसरातील अनेक महत्वाचे पूल पाण्याखाली गेले आहेत. इंद्रायणी नदीची वाढती पातळी आणि मुसळधार पाऊस पाहता वारकर्यांची देहू आणि आळंदी येथे गर्दी न करता थेट पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून किंवा त्यापुढील मार्गावरून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, दोन्ही देवस्थान संस्थानने केले आहे. आज तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाले आहे. पालखी आज देहूतच इनामदार वाड्यात मुक्कामी राहणार आहे. तर उद्या म्हणजे दि. 8 जुलैला माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रसथान ठेवणार आहे. बुधवारी पालखीचा मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यात असणार आहे. यादिवशी तुकांची पालखी आकुर्डी मुक्कामी पोहोचणार आहे.



Comments