आळंदीत इंद्रायणीला महापुर जनजीवन विस्कळीत; चारही पुलावरील वाहतूक बदं , भाविकांनी देहू, आळंदी ऐवजी पुण्याला येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- Navnath Yewale
- Jul 6
- 3 min read

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत सोमवारी (दि.6) इंद्रायणी नदीला आलेल्या महापुरामुळे स्थानिक जनजीवन
पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पूरस्थितीची गंभीर दखल घेत प्रशासनाने आळंदीला जोडणारे प्रमुख चारही पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले आहेत. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर, भाविकांनी सध्या आळंदीकडे न येता जिथे असाल तिथेच सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हा व राज्य प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
उद्या (दि.8) माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदीतून पंढरीसाठी प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्याला अजून 48 तासांचा आवधी असल्याने, माऊलीच्या पालखीचे प्रस्थान नियमित वेळेत आणि ठरलेल्या रुपरेषेनुसारच होईल, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्रद उमाप यांनी दिली आहे.
आषढी वारीसाठी उपाया योजनां राबवण्यात आल्या आहेत. इंद्रायणीच्या महापूरामुळे देहू, आळंदीकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. भाविकांनी देहू, आळंदीला येण्यापेक्षा उद्या पुण्याला यावे, भाविकांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी शासन प्रशासनाने घेतली आहे. आषाढी वारी निर्वीघ्न पार पाडण्यासाठी उपाय योजना राबवण्यात आल्या असून जबाबदार यंत्रणा चोक कर्तव्य पार पाडत आहेत. भाविकांनी देहू, आळंदीला येण्या ऐवजी उद्या पुण्यात येण्याची आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
प्रस्थान कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञाणेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट सर्व दिंडीप्रमुखांच्या सतत संपर्कात असून त्यांना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या जात आहेत. प्रत्येक वारकरी भक्ताने आपापल्या दिंडी प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे अवाहन करण्यात आले आहे. हा आषाढी सोहळा सर्वांना सुरक्षितपणे साजरा करावयाचा आहे, यावर देवस्थानने भर दिला आहे.
इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून नदी पात तुडूंब भरून वाहत आहेत. नदीच्या महापुराचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला आहे. नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर तसेच घाटाशेजारील काही दुकाने पाण्यात गेली आहेत. प्रमुख चारही पुलांवर पाणी आले आहे. अद्यापही इंद्रायणी नदीतील पाण्याची पातळी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.6) पहाटेपासून आळंदी पीएमपीएल बस स्थानकाशेजारी नदीवर असलेला जुना पूल, चाकण चौकातून देहू फाट्याकडे जाणारा पूल, सिद्धबेट परिसरातील पूल व पीएमपीएल बस स्थानकाशेजारील नवीन पूल असे चाही पूल प्रशासनाने वाहतूकीसाठी बंद केले आहेत.
पाणलोट क्षेत्रात सततच्या मुसळधार पावसाने इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र रविवारी (दि.5) सकाळपासून ही पाणीपातळी अधिकच वाढली होती. त्यांनतर सायंकाळी व रात्रभर पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा प्रवाहातदेखील मोठ्या गतीने वाढ झाली. दरम्यान लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच धरणातून इंद्रायणीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी नदीने रुद्रावतार धारण केला आहे. रविवारी पहाटे इंद्रायणी नदीचे पाणी सिद्धबेट शेजारील तसेच गरुडस्तंभ शेजारील पुलावर आले. त्यानंतर उर्वरित पीएमपीएल पुलाला पाण्याने स्पर्श केला.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस व नगरपालिका प्रशासनाने इंद्रायणी नदीवरील जुना पूल, चाकण चौकातील मुख्य पूल व सिद्धबेट लगतचा नवीन पूल बॅरिकेट लावून दळणवळणासाठी बंद केले. त्यामुळे शहराकडे येणारी व पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. मात्र दुपारी 3:00 वाजता नंतर नवीन पुलालाही महापुराने स्पर्श केल्याने हा पुलही बंद करण्याचा निर्णय घेऊन रस्त्याला बैरिकेट लावून सील करण्यात आले. त्यामुळे दुपारनंतर शहराकडे येणारी- जाणारी वाहतूक ठप्प झाली
दरम्यान, नदीलगतचे वाहनतळ, हरी हरेंद्र मठ, देविदास धर्मशाळा, भराव रस्ता, ज्ञाणेश्वरी मंदिरालगतचा परिसर, शनीमंदिरालगतच्या परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर घाटावर उभारण्यवात आलेल्या चेंजिंग रूम पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. तर ठेवण्यासाठी आलेली स्वच्छतागृह पाण्याखाली गेले आहेत.
इंंद्रायणी घाटावर भाविकांनी जाऊ नये यासाठी नगरपालिका व पोलिस प्रशासनाने नगरपरिषद चौक, महाराष्ट्र बँक, पान दरवाजा, शनी मंदिर, झाडी बाजार पार्किंग, इंद्रायणी नगर कमान, विश्वशांती केंद्र हवेली बाजू घाट आदी ठिकाणी आवश्यक ठिकाणी लाकडी बांबू व लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत. तर ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून नदीशेजारील दुकाने बंद ठेवली आहेत. पाऊस वाढत असल्याने इंद्रायणीच्या महापूराकडे नागरिकांनी व भाविकांनी जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर व वरिष्ठ पोलिस अधिकारी भीमा नरके यांनी केले आहे.



Comments