आशा आणि करुणेचा वारसा; ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे दु:खद निधन
- Navnath Yewale
- Apr 22
- 2 min read

सोमवारी सकाळी व्हॅटिकनमधून आलेल्या एका अतिशय भावनिक बातमीने संपूर्ण जगाला दु:खी केले. जगभरात करुणा, सहिष्णुता आणि शांतीचा आवाज मानले जाणारे 88 वर्षीय पोप फ्रान्सिस आता या जगात नाहीत. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे तेच पोप होते, ज्यांनी आयुष्यभर उपेक्षित लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि त्यांच्या सर्व संदेशामध्ये मानवतेला प्राधान्य दिले. त्यांची प्रकृती खराब असूनही, त्यांनी ईस्टर रविवारी व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स स्क्वेअर येथे हजारो भाविकांना शेवटचे संबोधित केले.
हे त्यांच्या सार्वजनिक जीवनातील शेवटचे दृश्य होते. जिथे ते पुन्हा एकदा जगाला शांततेचे आवाहन करत होते.गाझाच्या पीडितांना प्रार्थना करत होते आणि जगाला धर्म आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व समजावून सांगत होते.
शेवटच्या सार्वजनिक भाषणात शांततेची आशा
त्यांच्या मृत्यूच्या फक्त एक दिवस आधी, ईस्टर रविवारी, पोपने शेवटचे जगाला संबोधित केले. व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर स्क्वेअरमध्ये हजारो लोकांची गर्दी जमली होेती. व्हीलचेअरवर असलेल्या पोपने बाल्कनीतून हात हलवत लोकांना “हॅपी ईस्टर” च्या शुभेच्छा दिल्या. तथापि, त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांचा संदेश एका पुजार्याने वाचून दाखवला.
गाझांच्या लोकांसाठी विशेष प्रार्थना
त्यांच्या ईस्टर संदेशात पोपने गाझाच्या लोकांबद्दल, विशेष: तेथील ख्रिश्चन समुदायाबद्दल खोल चिंता व्यक्त केली. “ या संघर्षामुळ फक्त मृत्यू आणि विनाश होत आहे. लोक उपासमार, भीती आणि असुरक्षिततेत जगत आहेत” असे म्हणाले. त्यांनी संघर्षग्रस्त भागात शांततेचे आवाहन केले आणि ओलिसांची सुटाका करण्याची मागणी केली.
जगात धार्मिक स्वातंत्र्याच्या अभावाबद्दल चिंता
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या संदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, “ धर्म, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याशिवाय जगात शांती नाही.” त्यांनी यहुद्यांविरुद्ध वाढत्या द्वेषाचे वर्णन “चिंताजनक” असल्याचे सांगितले आणि जगाला सहिष्णुता आणि समजूतदारपणा स्वीकारण्याचा सल्ला दिला. युक्रेन आणि रशियामधील सुरू असलेल्या युद्धाचा संर्दी देत पोप म्हणाले की, “सर्व पक्षांनी न्याय्य आणि चिरस्थायी शांततेसाठी पावले उचलली पाहिजेत.” सामान्य लोकांच्या दु:खाची आठवण करून देत त्यांनी जागतिक नेत्यांना मानवता दाखवण्याचे आवाहन केले.
युक्रेन युद्धावरही चिंता व्यक्त
ईस्टरच्या निमित्ताने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म, एक्स द्वारे लोकांना संबोधित करताना पोप फ्रान्सिस यांनी लिहिले की, “ शांतता शक्य आहे ही आपली आशा आपण पुन्हा जागृत करावी अशी माझी इच्छा आहे! पवित्र सेपल्चर, पुनरुत्थान चर्च, जिथे या वर्षी कॅथोलिक आणि ऑर्थोलिक आणि ऑर्थोडॉक्स एकाच दिवशी ईस्टर साजरा करत आहेत, कडून पवित्र भूमीत आणि जगभरात शांतीचा प्रकाश पसरे.” ही त्यांची शेवटची सोशल मिडीया पोस्ट होती.
12 वर्षांचे खंबीर नेतृत्व
पोप फ्रान्सिस , ज्यांचे खरे नाव जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ आहे. 2013 मध्ये पोप म्हणून निवडले गेले ते पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते आणि चर्च बाल लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांनी त्रस्त असताना त्यांची निवड झाली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली चर्चमध्ये पारदर्शकता, नम्रता सेवेची भावना वाढवली.
शेवटच्या संदेशात करुणा आणि मानवतेची झलक
पोप फ्रान्सिसचा शेवटचा संदेश त्यांच्या संपूर्ण जीवनाचे प्रतिबिंब आहे. करुणा, माणवता आणि शांतीचा संदेश. त्यांनी नेहमीच उपेक्षित लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत तोच मार्ग निवडला.जग त्यांना एक धार्मिक नेता म्हणून लक्षात ठेवेल ज्यांनी केवळ चर्चला नव्हे तर संपूर्ण जगाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला.
Comments