top of page

इंडिया आघाडी फुटली?; डीएमकेचा सवता सुभा 22 लोकसभा खासदारांना वेगळ्या आसनव्यवस्थेचं कनिमोझीचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

देशातील 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय घडामोडींना वगे आला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवरुन पायउतार झाल्या. तर तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तामिळनाडूत टीव्हिके पक्षाची सत्ता येणार आहे. टीव्हिके पक्षाला काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर डीएमके पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.


डीएमके खासदार कनिमोझी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून लोकसभेत आसनव्यवस्थेत बदल करण्याची मागणी केली आहे. ‘ लोकसभेत डीएमके खासदारांसाठी आसनव्यवस्थेत बदल करावा. काँग्रेससोबत युती तुटल्यानंतर आमचे खासदार त्यांच्यासोबत बसणे योग्य ठरणार नाही, असे खासदार कनिमोझी यांनी स्पष्ट केले.


द्रविड मुनेत्र कडगमच्या वरिष्ठ नेत्या कनिमोझी यांनी पत्र लिहून संसदेत 22 खासदारांसाठी दुसरीकडे बसण्याची मागणी केली आहे. खासदार कनिमोझी यांच्या पत्रामुळे डीएमके आणि काँग्रेस पक्षाची युती राष्ट्रीय पातळीवरील तुटल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळत आहे. या पत्रामुळे डीएमके पक्ष इंडिया आघाडीतूनही बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.


तामिळनाडूत टीव्हिके पक्षाची सत्ता येणार असल्याचं निश्चित झालं आहे. टीव्हीकेला 4 राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. टीव्हीके पक्षाला आज शुक्रवारी सीपीआय, सीपीएम आणि व्हीसीके पक्षाने पाठिंबा दर्शवला तामिळनाडूत 5 आमदार असलेल्या काँग्रेसने टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे टीव्हीके पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे.

टीव्हीकेचे प्रमुख विजय हे शुक्रवारी पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहेत. त्यानंतर तामिळनाडूत सत्ता स्थापनेचा दावा करतील.

Comments


bottom of page