इंदोरीकर महाराजांच्या कन्येचा उद्या शाही विवाह; 100 एक्करावरील आलिशान मंडप पाहून डोळे दिपतील,जेवनाची रेलचेलसंत-महंत, पै..पाहूण्यांसह मोठमोठ्या राजकारणी दिग्गजांना निमंत्रण
- Navnath Yewale
- May 2
- 2 min read

समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा संगमनेरमधील गुंजाळवाडी येथे शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. तब्बल 100 एक्कर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री राजकीय नेते आणि संत-महंतांची उपस्थिती अपेक्षित असून, गगनगिरी महाराज सप्ताहाने सोहळ्याची सुरूवात होईल. साधेपणाचा संदेश देणार्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर सदैव चर्चेत असतात. कीर्तनातून इतरांना साधेपणाचा सल्ला देणारे,लग्न साधे करा, खर्च कमी करा असं सांगणार्या इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने ते काही महिन्यांपूर्वी वादात सापडले होते. त्यांच्यावर बरीच टीका झाली.
आता त्यांच्या मुलींच लग्न असून, लग्नपत्रिकाही समोर आली आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा, साहिल याच्याशी संगमनेरमध्ये होणार आहे.
या शाही विवाहसोहळ्यासाठी गुंजाळवाडी परिसरातील तब्बल 100 एकर जागेत या भव्य सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून त्यानंतर किर्तन आणि विवाह सोहळा पार पडणार आहे.

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री, राजकीय दिग्गज आणि संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अनेक राजकीय दिग्गज आणि संत-महंतांची या विवाहासाठी उपस्थिती अपेक्षित आहे. एकीकडे कीर्तनातून लोकांना साधेपणाचा संदेश देणारे इंदुरीकर महाराज आता विवाहामुळे पुन्हा चेर्चेत आले आहेत.
साध्या पद्धतीने लग्न करण्याचा संदेश देणारे इंदोरीकर महाराज आता स्वत:च चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कन्येच्या भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. “ उपदेश एक आणि आचारण दुसरं” असा सवालही नेटकर्यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी स्वत:च साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता उद्या होणार्या या विवाहसोहळ्याची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण परिसरात मोठा सोहळा उभारण्यात आला आहे. 100 एकरावर आलिशान मंडप उभारण्यात आला असून जेवणाचीही बरीच रेलचेल असणार आहे.
विशेष म्हणजे याच दिवशी गगनगिरी महराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रमही पार पडणार आहे. त्यानंतर किर्तनपुष्प आणि मग मुख्य विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नसमारंभासाठी मोठमोठे राजकारणी, दिग्गजांना संत-महंतांना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या विवाहसोहळ्याकडे राज्यभराचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, साधेपणाचा संदेश देणार्या इंदुरीकर महाराजांचा हा भव्य विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.



Working on a vintage journal digitization project — halftone density varies page to page. The textbook approach is writing FFT scripts; this browser descreening tool just runs in the browser and handles batches. Not museum-grade color-managed but fine for search-indexed scans.