इंदोरीकर महाराज यांच्या कन्येच्या शाही विवाह सोहळ्यात दिग्गजांची मांदिआळी
- Navnath Yewale
- May 3
- 2 min read

राज्याचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा आज संगमनेरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. निवृत्ती महराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाह साहिल चिलप यांच्याशी झाला. ज्ञानेश्वरी देशमुख यांचा साखरपुडा देखील चांगलाच चर्चेमध्ये आला होता. इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्याच्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर चांगलीच टीका झाली, त्यानंतर आज इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. या विवाह सोहळ्यावर देखील प्रचंड खर्च करण्यात आला. तब्बल 100 एक्करावरील भव्य मंडपाने पै-पाहूण्यांसह मान्यवरांची डोळे दिपले.
या शाही विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हारिभाऊ बागडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार राजाभाऊ वाझे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार श्वेता महाले, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, सत्याजित तांबे, विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे, शरद सोनवणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात आदींसह सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होत.
दरम्यान, इदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह आज संगमनेर येथे साहिल चिलप यांच्याशी संपन्न झाला. साहिल चिलाप हे एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. साहिल चिलाप हे मुंबईत वास्तव्यास आहेत, मात्र त्याचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात काटेडे हे आहे. काटेडे येथे देखील त्यांचं अलिशान घर असून त्यांच्याकडे शेती देखील आहे दरम्यान या लग्नसोहळ्यामुळे आता पुन्हा इंदोरीकर महाराज चर्चेत आले आहेत.
इंदोरीकर महाराजांचे टीकाकारांना उत्तर : इंदोरीकर महाराज म्हणाले की, जशी साखरपुड्याची चर्चा महिनाभर चालली तशी विवाहाची चर्चा आता वर्षभर होईल. ज्याची परिस्थिती चांगली त्यांनी विवाहसोळा करावा. लग्नात मी मठ्ठा, गुलाबजाम केले नाही. लग्नामध्ये मराठमोळं आणि सात्विक जेवन होतं. आज मुलगा, मुलगी मोठी झाले ते दिसत आहे. मी किर्तनासाठी फिरत असल्याने त्यांची भेट होत नव्हती. माझी आणि माझ्या मुलीची देखील तिन वर्ष झाले भेट नाही. मी विद्यालय चालवतो. एक रुपया घेत नाही. शाळेत 13 शिक्षक आहेत. आता प्रश्न विचारला जाईल एवढा पैसा आला कुठून? माझ्या भक्तमंडळाने 90 टक्के खर्च केला. देणार्याने दिला. त्यामुळे ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही. एक हटयोग आणि दुसरं ज्ञानयोग, असे दोन योग आहेत. नास्तिक लोक त्यांचा मूळ स्वभाव सोडत नाहीत. जेवढ प्रेम तुम्ही माझ्यावर केलं प्रेम टिकवलं, तसंच हे आता मुलाप्रमाणे शेवटपर्यंत टिकवावे, असंही यावेळी इंदोरीकर महाराज म्हणाले.



Planned a 180-guest Lebanese-American wedding last month and printed 50 cards with the wedding bingo maker, prompts like "someone cries during toasts" got real laughs during cocktail hour.
I did have to manually edit two prompts that felt too generic but the inline editor made it painless.