इरणा-इस्त्रायल ‘युद्धाला सुरुवात’; इराणच सर्वोच्च नेते खामेईंंची घोषणा
- Navnath Yewale
- Jun 18
- 2 min read

इस्त्रायल आणि इराण एमेकांवकर हल्ला करत असताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेई यांनी मोठा इशरा दिला आहे. खामेई यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, “ महान हैदरच्या नावाने, लढाई सुरू झाली आहे” हैदर हे नाव बहुतेकदा अली यांच्यासाठी वापरले जाते. ज्यांच्या शिया मुस्लिम पहिले इमाम आणि पैगंबर मोहम्मद यांचे उत्तराधिकारी मानतात. “ आपण दहशतवादी झिओनिस्ट राजवटीला कडक प्रत्युत्तर दिलं पाहिजे. आम्ही झिओनिस्टांना दया दाखवणार नाही” असं त्यांनी दुसर्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आम्हाला माहित आहे की तथाकथित ‘सर्वोच्च नेते ’ कुठे लपले आहेत, “ ते एक सोप लक्ष्य आहेत, परंतु तिथे सुरक्षित आहे. आम्ही सध्या तरी त्यांना बाहेर काढणार नाही (मारणार नाही) किमान सध्या तरी नाही. परंतु आम्हाला नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रांचा मारा नको आहे. आमचा संयम संपत चालला आहे. असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
गाझा पट्ट्यात हल्ला
इराण आणि इस्त्रायलमध्ये सध्या संघर्ष पेटला आहे. यादरम्यान इस्त्रायलने गाझा पट्ट्यात मदतीसाठी पोहोचलेल्या ट्रकबाहेर जमलेल्या गर्दीवर टँकने हल्ला केला आहे. या हल्ल्यात 59 लोक ठार झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. हल्ला झाला तेव्हा भुकेने व्याकूळ लोकांनी तिथे गर्दी केली होती. आतापर्यंतच्या संघर्षातील हा सर्वात रक्तरंजित हल्ला म्हणून पाहिलं जात आहे.
या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ समोर आला असून, व्हिडिओमध्ये दक्षिण गाझा पट्टीतील खान युनुस येथील एका रस्त्यावर सुमारे डझनभर मृतदेह पडलेले दिसत आहेत. ऑक्टोबर 2023 पासून गाझामध्ये हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांशी युद्ध सुरू असलेल्या इस्त्रायली सैन्याने या भागात गोळीबार झाल्याची कबुली दिली आणि ते या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले.
या हल्ल्यात किमान 59 जणांचा मृत्यू झाला असून 221 जण जखमी झाले, त्यापैकी किमान 20 जणांची प्रकृती गंभीर आहे, असं पॅलेस्टिनी डॉक्टरांनी सांगितलं. जखमींना कार, रिक्षा आणि गाढवांच्या गाड्यांमधून रुग्णालयात नेण्यात येत होतं. मे महिन्यात गाझामध्ये मदत पुन्हा सुरू झाल्यापासून एकाच दिवसात झालेला हा सर्वात मोठा मृतांचा आकडा आहे.
コメント