इराणकडून अमेरिकेच्या 18 कंपन्यांच्या कार्यालयावर हल्ल्याची धमकी जगाची झोप उडाली; मायक्रोसॉप्ट, गूगलचाही समावेश
- Navnath Yewale
- Mar 31
- 1 min read

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.अशातच आता इराणी लष्काराने अरब प्रदेशात असलेल्या अमेरिकेच्या 18 टेक कंपन्यांना थेट धमकी दिली आहे. इराणच्या मते या कंपन्या इराण- अमेरिका संघर्षात सहभागी आहेत. आयआरजीसी ने इशारा दिला आहे की, या कंपन्यांच्याद कर्मचार्यांनी कार्यालयांपासून दूर रहावे. उद्या रात्री 8 वाजल्यापासून हल्ल्यांना सुरुवात होऊ शकते. इराणने ज्या अमेरिकन कंपन्यांना धमकी दिली आहे, त्यामध्ये मायक्रोसॉप्ट, गूगल, अॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोइंग यांसारख्या मोठ्या कंपन्यांना समावेश आहे.
आयआरजीसी ने अमेरिकन कंपन्यांबाबत एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटले की, इराणमध्ये होणार्या कोणत्याही दहशवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात आम्ही काही निवडक कंपन्या आणि त्यांच्या युनिट्सना पूर्णपणे नष्अ करू ही चेतावणी 1 एप्रिल रोजी तेहाराच्या वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून ( भातीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता) लागू होईल असे सांगितले आहे. इराणने या कंपन्यांनमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना आपले प्राण वाचवण्यासाठी तात्काळ कार्यालय किंवा कार्यस्थळ सोडण्याचा सल्ला दिला आहे.
या कंपन्यांना दिली धमकी: डेल, मायक्रोसॉप्ट,गूगल, अॅपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला, बोइंग, ह्यूलेट पॅकार्ड, एचपी, सिस्को, ओरेकल,मेटा जेपी मॉर्गन, जनरल इलेक्ट्रिक, जी42, एनव्हिडिया, प्लॅन्टर
दरम्यान, इराणच्या लष्कराने असा आरोप केला आहे की, या मोठ्या आयटी आणि एआय कंपन्या इराणविरुद्ध चालवल्या जणार्या मोहिमांमध्ये अमेरिकेला मदत करत आहेत. या कंपन्या केवळ सॉप्टवेअर तयार करत नाहीत, तर हल्यांची योजना आखण्यात आणि ते अंमलात आणण्यातही सहभागी आहेत. इराणच्या या निवेदनात गूगल आणि कायक्रोसॉप्ट सोबत एंथ्रोपिक आणि ओपनएआयसारख्या प्रसिद्ध एआय कंपन्यांचाही उल्लेख करणत आला आहे.
इराणी लष्कराचा आरोप आहे की, या कंपन्या अमेरिकन आणि इस्त्रायली सैन्यासोबत काम करत आहेत. कंपन्यांकडून मानवरहित ड्रोन उडवण्यासाठी आणि अचूक लक्ष्य निश्ति करण्यासाठी मदत केली जात आहे. इराणने यापूर्वीही अशा प्रकारच्यसा धमक्या दिलेल्या आहेत. मात्र यावेळी इराणी सैन्याची निश्चित वेळ देखील सांगितली आहे. त्यामुळे अमेरिकेसह संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.



Comments