इराण-इस्त्रायलध्ये शांतता करारात रशिया मध्यस्थी करू शकतो!
- Navnath Yewale
- Jun 19
- 1 min read

सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचाच्या वेळी पुतिन म्हणाले की, रशियाचे रशियाचे इराणशी चांगले संबंध आहेत आणि रशियाने इराणमधील बुशेहर येथे पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासही मदत केली आहे. बुशेहरमध्ये आणखी दोन अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यात इराणला 200 रशियन कर्मचारी मदत करत आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी बुधवारी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली.
पुतिन म्हणाले की, मॉस्को असा करार करू शकतो, ज्यामुळे इराणला त्याचा अणुकार्यक्रम शांततेत चालवता येईल आणि इस्त्रायलच्या सुरक्षा चिंता देखील सोडवता येतील. एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना पुतिन म्हणाले की, ‘हा एक संवेदनशील मुद्दा आहे, परंतु माझ्या मते तो सोडवता येऊ शकतो.’
तु पुढे म्हणाले की, त्यांनी त्यांचा प्रस्ताव इराण, इस्त्रायल आणि अमेरिकेला पाठवला आहे. आम्ही कोणावरही काहीही लादत नाही आहोत. या परिस्थितीत पुढे जाण्याचा मार्ग काय असू शकतो, याबद्दल आम्हाला फक्त बोलायचे आहे. कोणताही निर्णय या देशांच्या नेतृत्वाने घ्यावा लागेल, रशियाचे पश्चिम आशियाई देशांशी चांगले संबंध आहेत, ज्यामुळे तो इराण-इस्त्रायल प्रकरणात एक चांगला आणि प्रभावी मध्यस्थ बनतो. पुतिन यांनी गेल्या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशीही चर्चा केली होती. ज्यामध्ये पुतिन यांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याची ऑफर दिली होती. शिवाय ट्रम्प यांनी प्रथम त्यांना रशिया-युक्रेन युद्धात युद्धबंदीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.
पुतिन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे कौतुक केले आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या वचनाचेही समर्थन केले. पुतिन यांनी असेही कबुल केले की, जर ट्रम्प 2022 मध्ये सत्तेत असते , तर रशिया आणि युक्रेनमधील युद्ध झाले नसते. ते युक्रेनशी युद्धबंदीसाठी बोलण्यास तयार आहेत. परंतु त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला.
Comments