इराण-इस्त्रायल युद्ध: इराणमधून 110 भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले.
- Navnath Yewale
- Jun 19
- 1 min read

इस्त्रायल आणि इराणमधील वाढत्या लष्करी तणावामुळे, परराष्ट्र मंत्रालय आणि भारत सरकारने आर्मेनियामध्ये अडकलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. भारतीय काश्मिरी विद्यार्थ्यांची पहिली तुकडी 90 विद्यार्थ्यांना घेऊन आर्मेनियाची राजधानी येरेवन येथील इवार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रवाना झाली. हे विशेष विमान रात्री उशिरा भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन नवी दिल्लीला पोहोचले आहे.
हे सर्व विद्यार्थी उर्मिया युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत होते आणि सुरू असलेल्या संघर्षामुळे आर्मेनियामध्ये असुरक्षिततेच्या भावनेने झुंजत होते. आता भारत सरकारच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे हे विद्यार्थी सुटकेचा नि:श्वास सोडू शकले आहेत.
एमईएचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की, ‘ऑपरेशन सिंधू’ सुरू झाले आहे. इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. भारताने 17 जून रोजी उत्तर इराणमधून इराण आणि आर्मेनियामधील आमच्या मिशनच्या देखरेखीखाली 1100 विद्यार्थ्यांना बाहेर काढले, जे आर्मेनियामध्ये दाखल झाले होते. ते येरेवनहून एका विशेष विमानाने निघाले आणि आज 19 जून 2025 रोजी सकाळी नवी दिल्लीत पोहोचले. भारत परदेशातील आपल्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतो.
विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे विमान आर्मेनियाची राजधानी येरेवनमधील इवार्टनॉट्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले आहे. ते रात्री 2 वाजता दिल्ली विमानतळावर उतरले. इराणमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी हे पहिले औपचारिक विमान मानले जात आहे. इवार्टनॉट्स विमानतळावरुन निघण्यापूर्वी या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी सांगितले की, आम्हाला इतक्या लवकर परत बोलावल्याबद्दल आम्ही भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाचे खूप अभारी आहोत. आम्ही भीती आणि अनिश्चिततेत होतो, परंतु आता घरी परतण्याचा आनंतद शब्दांच्या पलीकडे आहे. जम्मू आणि काश्मीर विद्यार्थी संघटनेच्या सहाकर्याने केलेल्या या बचाव मोहिमेचे खूप कौतुक केले जात आहे. संघटनेने आर्मेनियामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली होती आणि ती परराष्ट्र मंत्रालयाला दिली होती आणि सतत संपर्कात होती.
Comments