उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली साबाच्या अधिकार्यांची कानउघडणी
- Navnath Yewale
- May 25
- 2 min read

जुन्नर तालुक्यातील नारायगाव पोलिस ठाण्याच्या नवीन इमरातीचे बांधकाम करताना झालेल्या चुकांवर नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची शनिवारी चांगलीच कान उघडणी केली. इमारत बांधताना सूर्यप्रकाश, हवा अधिकाधिक खेळती कशी राहील आणि ‘व्हेंटिलेशन’ कसे राहिले पाहिजे, याकडे लक्ष द्या. जनतेच्या पैशातून इमराती तयार होत असल्याने पैशाच अपव्यय होणार नाही हे बघा, अशा शब्दात अधिकार्यांना सुनावले.
नारायणगाव पोलिस ठाण्याच्या नवीन इमरातीचे ÷उद्घाटन आणि लोकार्पण साहेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी झाला. उद्घाटनापूर्वी पवार यांनी पोलिस ठाण्याच्या नवीन इमरातीच्या बांधकामाची पाहणी केली या पाहणीत जाणवलेल्या त्रुटी दाखवित पवार यांनी संबंधित अधिकार्यांची कानउघाडणी केली. आमदार दिलीप वळसे पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळोच (म्हाडा) पुणे विभागाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्याशील शेरकर, आशा बुचके, गणपत फुलवडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधिक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपअधिक्षक भाग्यश्री धीरबस्सी, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी, अनिल मेहेर, सुजित खैरे, सहायक पोलिस निरिक्षक महादेव शेला यावेळी उपस्थित होते.
पोलिस ठाण्याच्या नवीन बांधलेल्या इमरातीमध्ये उंची काही प्रमाणात की ठेवण्यात आली आहे. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी याबाबत विचारणा केली असता पावसाचे पाणी शिरू नये, यासाठी उंची कमी ठेवल्याचे स्पष्टीकरण अकिधार्यांनी दिले. त्यावर पवार यांनी या भागात नक्की किती मिलिमीटर पाऊस पडतो, याची माहिती घेत पावसाचे पाणी जाऊ नये हे कारण देऊ नका. सार्वजनिक इमराती उभारतान सूर्यप्रकाश , हवा अधिकाधिक खेळती राहील, याकडे लक्ष दिले पाहिजे. या इमराती जनतेच्या पैशांतून बांधल्या जातात. त्याचे काम चांगलेच झाले पाहिजे अशा शब्दांत त्यांनी अधिकार्यांना सुनावले.
21 हजार कोटीं रुपयांची तरतूद
पोलिस दलाच्या पायाभूत सुविधांसाठी 21 हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक 1 हजार 400 कोटी रुपयांचा निधी पुणे जिल्ह्याला देण्यात आला आहे. 42 कोटी रुपये जिल्हा पोलिस दलासाठी मंजूर करण्यात आले असून,हा निधी जिल्हा ग्रामीण दलाने समन्वय राखून सायबर गुन्हे प्रतिबंधात्मक उपाययोजना अँटिड्रोेन गन, सीसीटिव्ही कॅमेरे, तसेच अद्ययावत वाहने यासाठी खर्च करावा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Comentários