उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या बैठकीतून घरी परला.. अन् 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसबीने अलगत धरला..!
- Navnath Yewale
- Jul 31
- 2 min read

बीड: उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार दोन दिवसीय बीडच्या दौर्यावर आहेत. काल त्यांनी विविध ठिकाणी भेटी देवून प्रगतीपथावरील कामांचा आढावा घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.31) जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. बैठक संपताच घरी गेलेला अधिकारी 45 लाख रुपयांची लाच स्विकारताना एसीबीच्या जाळ्यात आडकला. पालकमंत्र्यांची बैठक आटोपून घरी परलेला अधिकारी लाचेच्या जाळ्यात आडकल्याने बीडच्या अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार गुरुवार (दि.30) पासून बीड जिल्हा दौर्यावर आहेत. नियोजीत जिल्हा नियोजन समितीची बैठक व विविध विकास कामांचा आढावा व भूमिपुजन त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. शुक्रवारी (दि.31) जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. दरम्यान, पालकमंत्र्यांच्या बैठक आटोपुन दुपारी विभागीय वनअधिकारी श्रीनिवास लखमावार घरी गेले. त्यावेळी राहत्या घरी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
बीडच्या सामाजीक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांनी सन 2025-26 मधील वृक्षलागवडीची बीले मंजूर करून देणे, कर्मचार्यांचे थकित वेतन अदा करणे तसंच निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रारदाराने बुधवारी (दि.29, जुलै) छत्रपती संभाजीनगर येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर एसीबीने शुक्रवारी (दि.31) सापळा लावला. ठरलेल्या तारीख व वेळी विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांनी त्यांच्या निवासस्थानी 45 लाख रुपयांची लाच स्वीकारली असता छत्रपती संभाजीनगरच्या एसीबी पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधीक्षक माधुरी कांगणे बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
पाच लाख खर्या नोटा, तर 40 लाख डमी (मनोरंजन बँक) नोटा : ठरल्या प्रमाणे लाचेची 45 लाख रुपये मोठी रक्कम देण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात आली, ज्यामध्ये पाच लाख खर्या नोटा तर 40 लाख रुपयांच्या डमी (मनोरंजन बँक) च्या डमी नोटांचे बंडल खर्या नोटांच्या खाली शाबित लावण्यात आले, जेनेकरून लाच स्वीकारताना संशय येणार नाही. तक्रारदार आणि एसबीच्या पथकाने नियोजनबद्ध कामगिरीनुसार सामाजीक वन विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमवार यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले.



Comments