उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची महिलांसाठी मोठी घोषणा
- Navnath Yewale
- Mar 11
- 2 min read
‘लवकर या, लवकर जा..’ प्रणाली लागू ; मुंबई महानगर क्षेत्रातील शासकी महिला कर्मचार्यांना मोठी भेट

मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कर्मचारी महिलांसाठी मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचार्यांसाठी ‘लवर या, लवकर जा’ प्रणाली लागू करण्याची घोषणा केली. शासकीय नोकरीत असलेल्या महिला सकाळी 9:15 वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना त्यांना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल असंही सुुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या.
महिलांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली त्याबाबत आभारी आहे. महिला दिनानिमित्ताने अनेक वरिष्ठ नेत्यांनी सभागृहात भाषण केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या. काही चांगल्या सूचना यानिमित्ताने पुढे आल्या आहेत. या सभागृहात पुरुष सदस्यांनी देखील भावना व्यक्त केल्या, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या प्रश्नांसंदर्भाने भाषण केलं.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मी अत्यंत महत्वाची घोषणा करत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचार्यांसाठी महत्वाचा निर्णयद घेतला आहे. ‘लवर या, लवकर जा’ याची घोषणा करत आहोत. त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचार्यांना सकाळी 9:15 वाजता कार्यालयात आल्या तर घरी जाताना त्यांना अर्धा तास लवकर सोडण्यात येईल, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. सरकारने लाडकी बहीण, लेक लाडकी, अन्नपूर्णा सारख्या योजना आपण आणल्या आहेत. मेट्रोमनी साईड वरून होणारी फसवणूक रोखण्यासाठी देखील कायदा करण्याबाबत प्रयत्न केले जातील. लाडकी बहीण योजना प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील 17 हजार अंगणवाडीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अशी महितीही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.
राज्यात नविन उद्योग आणताना राज्यातील या कारखान्यांकडे मायेच्या नजरेने पाहायला पाहिजे. कारखाने का तोट्यात येतात, कारण एमएसपी ठरवण्याचा अधिाकर हा केंद्राचा आहे, एमएसपी वाढली पाहिते. केंद्राने आता इथेनॉल योजना आणली आहे. साखर कारखान्यांनी कर्ज काढलं, कारखाने उभे राहिले, इथेनॉल किती घ्याचं हेही तेच ठरवतात. आता सरकार म्हणतंय की इथेनॉल हे कारखान्यांकडून 30 टक्के घ्या आणि अन्नधान्यापासून 70 टक्के घ्या, असे म्हणत साखर कारखान्यांचाही मुद्दा सुनेत्रा पवार यांनी उपस्थित केला.



Comments