top of page

उष्णतेचा कहर! अकोल्यात पारा 46 अंशावर, परभणीत उष्माघाताचा मृत्यू ; राज्यात अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी

मुंबई: राज्यभरात उष्णतेचा पारा प्रंचडं वाढला आहे. नागरिकांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही होत आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात उन्हाचा तडखा वाढत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत. आकोल्यात काल या मोसमातील सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत तपामाण 46 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शहरात ऐन दुपारी अघोषित संचाबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


गेल्या काही दिवसांत अकोल्यात तपामानात सातत्याने वाढ होत आहे या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असलेल्या शहरांपैकी एक ठरत आहे

तापमानाचा वाढता पारा:

21 एप्रिल : 43.6

22 एप्रिल: 43.7

23 एप्रिल : 44.3

24 एप्रिल: 45.0

25 एप्रिल 45.6


परभणीत उष्माघाताचा बळी : परभणीत शिवाजी बबन कांबळे (वय 37 वर्षे) यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


जळगाव शहरात तपामाण 43 अंशांच्या पुढे गेल्याने महानगरपालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहिम राबवली आहे. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार ही कारवाईकरण्यात आली.

मुंबई उन्हाचा पार 39 वर : मुंबईत उन्हाचा तडाखा वाढला असून एप्रिल महिन्यातच मुंबईचा पारा 39 अंश सेल्सिअस वर पोहचला आहे. हवामान विभागाकडून खरंतर रविवारी आणि सोमवारी मुंबई शहरात आणि मुंबई लगतच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. यानंतर आज मुंबईत चक्का पारा 39 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. या उन्हापासून बचासाठी मुंबईकरांनी घरी रहाण्यास पसंती दिली.


विज मागणीत विक्रमी वाढ : देशातील वीज मागणीचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात विजेच्या मागणीने 240 गिगावॉटचा टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी 242.77 गिगावॉट इतकी नोंदवली गेली. वाढती उष्णता आणि एप्रिल महिन्यापासून सुरू झालेल्या हीटवेव्हमुळे देशभरात विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.

उन्हाळी हंगामातली आतापर्यंतहची ही सर्वाच्च पातळी आहे. कमाला तापमान 40 ते 45 सेल्सिअसच्यादरम्यान असल्याने आणि उष्णतेच्या लाटांचा प्रभाव असल्यामुळे एसी, कुलर्स आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कृषी क्षेत्रात पंप संचांचा वापर वाढल्यामुळे विजेचा खप वाढला आहे. उन्हाळ्यात विजेची सर्वाधिक मागणी अंदाजे 270 गिगावॉटपर्यंत पाहोचू शकते असा अंदाज विद्यूत विभागाने वर्तवला आहे.


नागरिकांना आवाहन : प्रशासनाने नागरिकांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.

Comments


bottom of page