top of page

एपीएमसीच्या मतदानापूर्वीच कल्याणमध्ये राडा !



कल्याण एपीएमसीच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी उद्या (रविवार,28 जून) मतदान होणार आहे. त्याच्या पूर्वसंधेलाच निवडणुकीच्या रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार कपील थळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत माळी यांना मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

थळे यांनी माळींना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार एपीएमसीच्या प्रशासकीय कार्यालयात पाहिल्या मजल्यावर घडला आहे. या प्रकरणी माळी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले असून पोलीस प्रक्रिया सुरू आहे.


एपीएमसीच्या संचालक पदाच्या निवडणुकीत 15 उमेदवार उभे आहेत. त्यासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत एपीएमसीचे माजी सभापती कपील थळे हे महायुतीकडून रिंगणात आहेत. तर महाविकास आघडीचे प्रशांत माळी हे निवडणुक रिंगणात आहेत. थळे यांच्या भ्रष्टाचारावर माळी यांनी निवडणुक प्रचारात बोट ठेवले. या गोष्टीचा राग मनात धरून थळे यांनी एपीएमसीच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ माळी यांना गाठले त्यांच्या सोबत काही समर्थक होते. त्यांनी माळी यांना मारहाण केली. त्यांना शिवीगाळ करीत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप माळी यांनी केला आहे.


या प्रकरणी माळी यांनी पोलीस ठाणे गाठून थळे यांच्या पासून जीवित्वास धोका असून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. पोलीसांनी माळी यांना वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून त्यानंतरच तक्रारीची पुढील प्रक्रिया होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंधेलाचा एपीएमसीच्या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये राडा झाल्याने खळबळ उडाली आहे.

Comments


bottom of page